शिवलिगेश्वर मंदीर सिडको येथे अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन

नवीन नांदेड। शिवलिगेश्वर मंदीर सिडको येथे१३ ते २०एप्रिल२४ दरम्यान अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, असुन २० एप्रिल रोजी शिभप किर्तन केसरी भंगवतराव पाटील चाभगेकर यांच्या शिव किर्तन,महाप्रसाद व शिवपार्वती विवाह सोहळयाला शिवभक्त सेवा मंडळाचे प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे.
श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज व श्री शिवलिंगेश्वर भगवान यांच्या कृपा आशिर्वादाने आमच्या येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताह शनिवार दि. १३ ते शनिवार दि. २०/०४/२०२४ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाला गुरुवर्यांचे अमृतोपदेश लाभणार आहेत.
या शिवनाम सप्ताहात खालील गुरुवर्यांचे अमृतोपदेश होईल
श्री गुरु १०८ ष.ब्र. डॉ. नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज, लासीन मठ, पुर्णा (ज.) श्री गुरु राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज, वीरमठ राजुर, अहमदपुर ,आचार्य गुरुराज स्वामी, भक्तीस्थळ अहमदपुर यांच्ये तर सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५ ते ६ शिवपाठ, सकाळी ६ ते ७ अन्नदात्यांकडून शिवलिंगेश्वरास रुद्राभिषेक, ८ ते ११ परमरहस्य ग्रंथाचे सामुदायीक पारायण, ११ ते १२ प्रवचन, दुपारी ३ ते ५ मन्मथ गाथा भजन व ५ ते ६ शिवपाठ, रात्री ९ ते ११ शिवकिर्तन व शिवजागर होणार आहे.
या सप्ताह मध्ये कीर्तनकार, शि.भ.प. महादेव स्वामी लांडगेवाडी ,शिभप, सौ.शिवकांता ताई पळसकर शिभप श्रीराम देशमुख सिडको, शिभप विकास भुरे मांजमकर,शिभप रजनीताई मंगले गंगाखेड,
शि.भ.प. नागेश स्वामी कुरुंदवाडीकर, शुक्रवार १९रोजी शि.भ.प. आण्णाराव होनराव गुरुजी,शिभप व्यंकटराव कार्लेकर, यांचे होणार आहे.
शनिवार २० एप्रिल २४ शिभप कीर्तन केसरी भगवंतराव पाटील चांभगेकर यांचे स.९ ते १२ प्रसादावरील शिवकिर्तन व शिवपार्वती विवाह सोहळा व गुरुवर्यांचे आशीर्वचन नंतर महाप्रसाद, विशेष उपस्थिती शिवभक्त सेवामंडळाचे अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे (शिवा संघटना) हे राहणार आहेत.
परमरहस्य पारायण व शिवपाठ प्रमुख शिभप श्रीराम देशमुख, हरीभाऊ नेरनाळे गाथा भजन प्रमुख शिभप हरीभाऊ नेरनाळे, माणिकराव नाईकवाडे,सदाशिव माताळ,विठ्ठल पा.शेळगावकर, गायक सौ.संगीताताई कार्लेकर,चंद्रशेखर शिराळे, बालाजी भुरे,संतोष देशमुख चोरंबेकर, माधवराव टेलर सुगावकर, पावडे नांदेड, नंदूआप्पा देवणे,मुदंग वादक पंढरीनाथ महाराज कराळे ख. धानोरा, चंद्रशेखर शिराळे,तर हार्मोनियम वादक बाबाराव शिराळे, भाऊराव कनकापुरे,नागनाथ आप्पा सोलपुरे,गुंडाळे यांच्ये राहणार आहे.
सप्ताहयास विशेष सहकार्य म्हणून विरवैरागिणी आक्का महादेवी महिला भजनी मंडळ, हडको याचे सहकार्य राहणार आहे, या सप्ताहास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवभक्त सेवा मंडळ,अखंड शिवनाम सप्ताह समिती व समस्त समाज बांधव सिडको-हडको नविन नांदेड यांनी केले आहे.
