नवीन नांदेड। ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ व्यसन असून विद्यार्थ्यांनी हे व्यसन आवर्जून करावे. पालकांनी प्रथम आचरण योग्य ठेवावे म्हणजे पाल्य स्वतः अनुकरण करुन आपल्यात बदल करुन घेतात,शिवाजीराजे, डॉ. आंबेडकर यांच्या आदर्शावरती चालून आपला कायम विकास करुन घ्यावा, असे प्रतिपादन पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी विष्णुपूरी शाळेतील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित स्नेह संमेलन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काढले.
२६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा विष्णुपरी येथे सांकृतिक महोत्सव-२०२४ आयोजित करण्यात आले होते, यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. संत बाबा हरजिंदरसिंगजी, विष्णुपूरी डेरेवाले,डॉ.मनेशबी,कोकरे,संचालक,एसजीजीएस इंजिनिअरिंग महाविद्यालय ,भार्गव करीअर अँकँडमीचे भार्गव राजे, डॉ ए.बी.गोंडे,डॉ नांदेडकर, डॉ.अरुण पाटील,डॉ मंठाळकर, डॉ देठे,श्रीमती बनसोडे, उपस्थित होते. याप्रसंगी विष्णुपूरीचे नवनिर्वाचित पोलीस पाटील प्रविण पंडितराव हंबर्डे यांचा सन्मान डॉ .नांदेडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यासमयी डॉ कोकरे यांनी पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना सोलार लँम्प देवून सत्कार केला व शाळेस दत्तक सुद्धा घेतले. स्पर्धा परीक्षेसाठी पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी विशेष टिम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने पाठवण्याची मागणी तात्काळ मान्य केली. सर्व मान्यवरांना तंत्रस्नेही शिक्षक डि.के.केंद्रे व सोमनाथ बिदरकर यांनी तयार केलेला उपक्रमाचा व्हिडीओ दाखवून शाळेची प्रगती एल.ई.डी.स्क्रिनव्दारे दाखवण्यात आली. गावची शान असलेला व भारतीय लष्करात नवीन लेफ्टनंट म्हणून निवड झालेल्या मनदीपसिंग जितेंद्रसिंग सिलेदार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला कृष्णाजी जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी व एम.ए.खदिर यांनी केले तथा आभार कृष्णा बिरादार यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष साहेबराव हंबर्डे, विश्वनाथराव हंबर्डे,शंकरराव हंबर्डे, सरपंच सौ.संध्या विलास देशमुख हंबर्डे,उपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे ,राजेश हंबर्डे,अनिल हंबर्डे, संतोष बारसे, गोविंदराव हंबर्डे, बाबुराव हंबर्डे, फौजी शिवाजीराव, काचमांडे,डॉ प्रमोल हंबर्डे,केशव चव्हाण, गिरमाजी हंबर्डे व बहुसंख्य पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय काशीनाथराव हंबर्डे,पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक,आनंद वळगे, विकास दिग्रसकर,पंचफुला नाईनवाड, चंद्रकला इदलगावे,जयश्री देवशेट्टे, अर्चना देशमुख,वैशाली कुलकर्णी, कांचनमाला पटवे व समस्त शिक्षक,शिक्षिका तथा कर्मचारी भरीव परिश्रम घेतले.