निवडणुकीच्या कामात दिरंगाई केल्यास कार्यवाही-सहायक निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार
लोहा। लोकसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कामात दिरंगाई करू नये.वेळेत काम करावे.कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवा करण्यात येईल.ग्रामसेवक हे गावातील आचारसंहिता प्रमुख तर पोलीस पाटील हे गावपातळीवर स्थानिक कर्मचारी व सहायक आहेत त्यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणीचे पालन होते की नाही याची दक्षता घ्यावी .कामचुकरपणा केल्यास गुन्हे दाखल होतील असा सूचना लातूर लोकसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लोहा तहसील कार्यालयात सहायक निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार ,लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी शनिवारी -रविवार या दोन दिवसात मॅरेथॉन बैठका घेतल्या. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच शनिवारी सायंकाळी दोन्ही तालुक्यातील पाच पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी, ग्रामसेवक मंडळाधिकारी यांची बैठक झाल्या नंतर रविवारी सकाळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी याची बैठक व पत्रकार परिषद झाली त्यानंतर दोन्ही तालुक्यातील मतदार संघातील पोलीस पाटील ,ग्रामसेवक यांची व्यापक बैठक सहायक निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी घेतली.
त्यात गाव पातळीवर सार्वजनिक ,खाजगी ठिकाणी केलेले विद्रुपीकरण(विरुपण) काढून टाकणे, राजकीय पक्षांच्या संबंधित असलेले पोस्टर, फलक, कोनशील झाकून ठेवणे असा सूचना दिल्या यात चोवीस, अठठेचाळीस, व बहातर तासात कोणतीच कार्यवाही केली नाही तर ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्या विरुद्ध कार्यवाही होईल असा सक्त सूचना त्यांनी दिल्या .तहसीलदार विठ्ठल परळीकर कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी बैठकीस मार्गदर्शन केले ., लोहा बिडिओ आडेरोघो, कंधार बीडीओ महेश पाटील नायब तहसीलदार संजय भोसीकर, डी डी लोंढे, अनिल परळीकर, अशोक मोकले उपस्थित होते
आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी
लातूर लोकसभा मतदार संघातील लोहा विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक व खाजगी ठिकाणीं असलेले वॉल पेंटिंग, पोस्टर,बॅनर, लोहा शहरात २६४, कंधार शहर -१०५, व लोहा पंचायत समिती अंतर्गत ८७,तर कंधार पंचायत समिती अंतर्गत -५१ असे एकूण ४०२ काढण्यात आले आहे. निवडणूक जाहीर झाल्या नंतर शनिवार -रविवारी या दोन दिवसात ही कार्यवाही झाली.