नायगाव, रामप्रसाद चन्नावार। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती नायगाव खै. अंतर्गत 1480 सहायता समूहांना तीन दिवस हिशोबनीय प्रशिक्षण तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथे घेण्यात आले होते,नुकतेच संपन्न झालेल्या प्रशिक्षण महिला समूहांना गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे यासह तालुका अभियान व्यवस्थापक मलेश एडके, तालुका व्यवस्थापक इरवंत सूर्यकार,बीआरटी सोनूताई कदम सोमठाणकर यांनी मार्गदर्शन केले आहे.
प्रारंभी ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन संपूर्ण महिलांनी केल्यानंतर दिनांक 27 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या या मूलभूत लेखी हिशोबनीय प्रशिक्षणात सुजलेगाव, शेळगाव छत्री, राजगडनगर आदी गावातील एकूण साठ महिलांची उपस्थिती होती या गावातील लेखी अद्यावत करण्यासाठी तीन दिवस प्रशिक्षण घेण्यात आले असून उपस्थित महिलांना तालुका प्रशिक्षक सोनूताई धनराज कदम यांनी सखोल मार्गदर्शन केले आहे.
तर तालुक्यातील बळेगाव गडगा आणि बरबडा येथेही लेखी अद्यावत करण्याबाबत प्रशिक्षण 28, 29 डिसेंबर रोजी चालू होते गडगा येथे ज्योती पोतलवाड, बरबडा कल्पना शिंदे आणि बळेगाव येथे विद्या हनुमंते यांनी समूहाची लेखी अद्यावत करण्याची प्रशिक्षण दिले गेले सुजलेगाव येथे संपन्न झालेल्या प्रशिक्षणात बाबू डोळे, बालाजी गिरी, सीआरपी कल्पना मारुती तांदळे, बँक सखी मायावती रामदास सुर्यकार,भारत माता महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा रिंका बालाजी पामलवाड सचिव चंद्रकला माधव झगडे, कोषाध्यक्ष चित्रकला विनोद देवाले,लिपिका अंजना रामदास शिंदे समूह संसाधन व्यक्ती शेळगाव छत्री येथील सोनाली संजय पेदे राजगडनगर येथील मीरा पोचिराम झगडे, अध्यक्षा ज्योती साहेबराव सुर्यकार यासह गावातील मास्टर अण्णाभाऊ शेळके,कॉम्रेड रामदास सुर्यकार, हरिभाऊ नवारे, सुभाष सुर्यकार, यांची उपस्थिती होती तर शेवटी उपस्थित सर्व महिलांनी मुलगा मुलगी समानतेची शपथ घेऊन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे.