महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ०७ कर्मचाऱ्यांना नियुक्ती तर ०२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप
नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसास / पाल्यास त्यांच्या रिक्त झालेल्या सफाई कामगार या पदावर वारसा हक्काने वर्ग-४ संवर्गात नियुक्ती देण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने महापालिकेत दिनांक ३१.०७.२०२४ रोजी *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते एकुण ०७ कर्मचाऱ्या ऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
तसेच याच कार्यक्रमामध्ये महापालिका सेवेतुन नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणाऱ्या ०२ कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.
उच्च न्यायालयाने लाङ-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्याची प्रक्रिया ही काही कालावधीपासुन थांबविली होती. तसेच काही विशिष्ट जात समुहाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच नियुक्ती देण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले होते.
परंतु नजिकच्या कालावधीत अनुसुचित जाती समुहातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सुध्दा नियुक्ती देण्याची मुभा न्यायालयाने दिल्यामुळे महापालिकेत आज ०७ सफाई कर्मचाऱ्याऱ्यांच्या पाल्यांना त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नियुक्ती देण्यात आली असुन यामध्ये विक्रम दत्ता सरोदे, अशिष बाबाराव कदम, प्रदिप उत्तम तारु, योगेश घुराजी सुतारे, मिना बाबु साखरे, शांताराम चतुर तोबरे व प्रविण विनोद जोंधळे यांना आयुक्तांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. यावेळी सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मनपा आयुक्तांचे आभार व्यक्त केले.
तसेच आज रोजी महापालिका सेवेतुन एकुण ०२ कर्मचारी नियत वयोमाना नुसार सेवा निवृत्त झाले असुन त्यामध्ये अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त मल्हार मोरे व स्वच्छता विभगातील श्री फारुख अ गफार यांचा समावेश होता.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह मुख्य लेखापरीक्षक तु.ल. भिसे, उपआयुक्त कारभारी दिवेकर, स.अजितपालसिंघ संधु, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने, लेखाधिकारी चन्नावार, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे, जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे व इतर मनपा कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.