क्राईमनांदेड

नवऱ्याला मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार; सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहरे। माहूर तालुक्यातील मोदी शेलु गंगाजी नगर येथे महिलेच्या नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार केल्याची खळबजनक घटना ता. १ जुलै रोजी घडल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सेलू – गंगाजीनगर येथील एका ३३ वर्षीय विवाहितेने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबाप्रमाणे ती विवाहिता दि. १ जुलै २०२४ रोजी सेलू वरून गंगाजीनगरकडे जात असताना सेलू येथील आरोपीच्या जुन्या घराजवळ ती महिला आल्यानंतर आरोपीने तिच्या नव-याला जिवे मारण्याची धमकी दिली. तनंतर त्या महिलेला आरोपीच्या रस्त्यालगत असलेल्या जुन्या घरी नेवून अत्याचार केल्याची फिर्याद सदर पिडीत विवाहीतेने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिली आहे.

दरम्यान विवाहितेच्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५७/२४ कलम ६४ (१), १२७ (२), ३५१ (२) (३) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे पवन लक्ष्मण गायकवाड वय २६ रा. गंगाजीनगर ता. माहूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सिंदखेड पोलीस ठाण्यात नव्याने रूजू झालेले सहायक पोलीस निरिक्षक आर.बी. जाधवर हे करीत आहेत.

“विशेष म्हणजे १ जुलैपासून लागू करण्यात आलेल्या भारतीय न्यायसंहितेच्या नवीन कायद्यानुसार सिंदखेड पोलीस ठाण्यातील हा पहिलाच गुन्हा असून अशा स्वरूपाच्या गुन्ह्यातील कायद्यात झोलेले बदल व नवीन कायद्यानुसार राखावयाची गोपनीयताा यामुळे प्रकरणातील अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!