उस्माननगर, माणिक भिसे। मारतळाहून हळदा मुखेड जाणाऱ्या भरधाव वाळूच्या हायवा टिप्परने हळदा येथील एस आर के ऍग्रो फूड अँड फ्युएल प्रा.लि कारखान्याच्या समोर कारखान्यातून भावाला भेटून बाहेर निघतात बलराम चा वेगवान येणाऱ्या हायवा टिप्परने नियतीने घात केला.
बलराम गोविंद गायकवाड वय सोळा वर्षे इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेला हा मुलगा वर्गात हुशार आणि सर्व खेळात प्राविण्य असलेला आई-वडिलांचा व सर्वाच्या आवडता घरातील सर्व व्यक्ती पुढील महिन्यात घरात लग्न असल्यामुळे खरेदीसाठी नांदेडला गेल्यामुळे 20 नोव्हेंबर सायंकाळी हळदा येथून गावाच्या जवळ असलेले जवळून गुंडा येथे घरच्या जेसीबी काम चालू असल्यामुळे घरच्या व्यक्तींनी बलराम ला ड्रायव्हरला डबा व डिझेल देण्यासाठी सांगितल्याने बलराम मोटरसायकल द्वारे चालकाला डबा व डिझेल देऊन येथील साखर कारखान्यात मध्ये जाऊन मित्रांना व भावाला भेटला भेटून मोटर सायकल दारे कारखान्याच्या बाहेर येताच भरधाव मारतळावून येणारी वाळूच्या भरलेला हायवा टिप्पर एम एच 24 ए यु 2669 बलराम जागेवर चिरडले.
कारखान्याच्या दोन्ही बाजूने वाहने असल्यामुळे बलरामलाही वाहन दिसले नाही व टिप्पर चालकालाही वाहन दिसले नाही त्यामुळे हा अपघात झाला अपघात होताच टिप्पर चालक भरधाव वेगवानात पुढे निघून गेल्याने तेथील काही नागरिकांनी गावातील नागरिकांना कळवले सांगितले व तिथून जवळच दोन किलोमीटर अंतरावर आश्रम चौकात सदर टिप्पर चालकास पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.असून उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वाहन क्रमांक एम एस 24 ए यु 2669 या क्रमांकाच्या हायवा टिप्पर चालकाला पोलीस स्टेशन येथे अपघाताची माहिती करता पुढील काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे व झालेल्या घटनेत संबंधित जखमी व्यक्तीस शासकीय दवाखाना विष्णुपुरी येथे हलवण्यात आले आहे अशी माहिती उस्मानगर पोलीस स्टेशन वर देण्यात आली आहे.
बलराम गोविंद गायकवाड या तरुणास एका हायवा टिप्परने उडवले होते त्यात त्याचा शासकीय दवाखाना विष्णुपुरी जाण्यापूर्वीच रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. संबंधित वाहन चालक आरोपीस पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे. पोलीस पाटील विलास बुरफुले हाळदा यांनी सांगितलं.