
नांदेड| आज दिनांक 30डिसेंबर रोजी भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यालयाच्या वतीन नांदेड साठी नेमलेल्या लोकसभा समन्वयक रूपालीताई रमेश सिंह ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड भाजपा महानगर महिला मोर्चा च्या कार्यालयात आढावा बैठक नांदेड महानगर महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्रद्धाताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी आयोध्या मध्ये होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन समईच्या नांदेडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील बचत गट व महिलांचे वेगवेगळे सामाजिक संघटन व समाजाच्या इतर महिलांच्या अडचणी प्रश्नांवर विस्तारित चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा महानगर जिल्हा उपाध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण, अंबिकाताई तेहरा, परळी च्या वैष्णवीताई ठाकूर भाजपाच्या महानगर सरचिटणीस अनुराधा ताई गिराम,अश्विनीताई जाधव, कमल मित्र अभियानाच्या प्रमुख यशोदाताई केंद्रे, नवा मोंढा मंडळ अध्यक्षा सुमनताई मामीडवार, सौ.शारदा आबादार सोशल मीडिया प्रमुख इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
