बोरगडीच्या मारोती मंदिरात भक्तांची मंदियाळी; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

हिमायतनगर| चैत्र शुद्ध १५ दि.२३ मंगळवारी आलेल्या हनुमान जन्मोत्सव निमित्ताने विदर्भ -तेलंगाना – मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्या बोरगडी येथील मारेाती मंदिरात संकटमोचन श्री बजरंगबली हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जय हनुमान.. बजरंग बली की जय…पवनसुत हनुमान की जय.. अशा जयघोषात भक्तांनी नारळ फोडुन प्रसाद अर्पण करवून हनुमंतरायाचे दर्शन घेत सुखसमृध्दीची कामना केली. याप्रसंगी दर्शनासाठी हजारेा श्रध्दाळु भक्तांची मंदियाळी झाली होती.
प्रभु श्री रामचंद्राचे परमभक्त श्री हनुमान यांच्या जन्मोत्सव दिनी प्रतीमा-मुर्तीची पुजा अभीषेक केल्याने मणुष्य भयमुक्त होतो असे सांगीतले जाते. यासाठी सर्वच गाव, वाडी, तांड्याच्या बाहेर श्री बजरंग बली मुर्तीची प्रतीष्ठापना करुन मारेातीरायाचे मंदीर गावाच्या सुरक्षेच्या हेतुने उभारलेले असते. या दिवशी बजरंगबलीला प्रीय असलेली रुचकीच्या पाने – फुलांची पुष्पमाला, दस्ती टोपी, फेटा अर्पण करुन सर्व संकट, दुखः दुर करण्याची मनोकामना भक्त करतात.
त्याच पार्शवभूमीवर दि.23 मंगळवारी संकटमोचन, दुखःनिवारक श्री बजरंगबलीचा जन्मोत्सव चैत्र पोर्णीमेच्या दिवशी मोठ्या हर्षोल्हास व मंगलमय वातावरणात बोरगडी येथील मारेाती मंदिरात पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या मंगलमय मंत्रोच्चारात पार पडला. तसेच तालुक्यातील सातशीव वटफळी येथील हनुमान मंदिरात आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दर्शन घेतले.
हिमायतनगर शहरातील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या दक्षीन मुखी हनुमान मंदिरात, श्री परमेश्वर मंदिरातील हनुमान मंदिरात उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, पोलीस निरीक्षक यासह अनेक मान्यवरांनी हनुमानाचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला. तसेच तालुक्यातील पळसपुर हनुमान मंदिर, सवना ज, दरेसरसम, सरसम बु, मंगरुळ, वडगांव ज, कार्ला पी.पोटा बु, सिबदरा, सिरंजणी, एकंबा, पवना, टेंभी, यासह अन्य छोट्या मोट्या गावात रामभक्त श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यानीमीत्ताने सर्वच मंदिरात भजन- किर्तन, महाप्रसादाच्या पंगती करण्यात आल्या. यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. हनुमान जन्मोत्सव नीमीत्ताने लागणारे नारळ, बेलफुल, पेढा, साखरेचा पेढा, फुलांचे हार आदीची दुकाने सर्वत्र सजली होती.
