हिमायतनगर, असद मौलाना| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांची नुकतीच लातूर येथे बदली झाली आहे. त्यांनी आपला चार्ज येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविला असून, आज मंगळवारी येथील पत्रकार बांधव, व्यापारी बांधव, पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.
दुपारी १ वाजता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेअरमन गणेशराव शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी संचालक रफिक शेठ, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, व्यापारी राजू बंडेवार, गजानन तूपतेवार, सुधाकर पाटील, गौतम पिंचा, संजय माने, प्रवीण कोमावार, असलम सेठ भांडेवाले, पत्रकार प्रकाश जैन, अशोक अनगूलवार, कानबा पोपलवार, पांडुरंग गाडगे, असद मौलाना, संजय मुनेश्वर, अनिल मादसवार, मन्नान भाई, रामभाऊ ठाकरे, विजय वळसे, फेरोजखान पठाण, मोहम्मद जावेद, अन्वर खान, विठ्ठल ठाकरे, रामभाऊ सूर्यवंशी, वामनराव मिराशे, जावेद खातीब, गजानन चायल, संजय माने, विलास वानखेडे, भाऊराव वानखेडे, अश्रफ भाई, मुन्ना शिंदे, सोपान कोळगिर, आदींसह शहातील नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम रफिक सेठ यांनी शाळा श्रीफळ पुष्पहार अर्पण करू पुढील आर्यकाळास शुभेच्छा देत निरोप दिला. त्यानंतर श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्यावतीने शुभेछा देण्यात आल्या. त्यानंतर येथील पत्रकार, व्यापारी, पोलीस अधिकारी कर्मचारे बांधवानी शाल पुष्पहाराने पोलीस निरीक्षक भुसनूर यांना निरीप देत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांनी पोलीस निरीक्षक बी डी.भुसनुर यांच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नाही यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने शहर व तालुक्यातील गुन्हेगारीवर आळा घातल्या बद्दल अनेकांनी कौतुक करून पुन्हा प्रमोशन होऊन उपविभागीय अधिकारी झाल्यानंतर बदली होऊन भोकर उपविभागात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.