नांदेड/बिलोली| भुकेल्याला अन्न द्या… तहानलेल्या पाणी द्या…. अडाण्याला ज्ञान द्या… गराजवांतची मदत करा…मग तुमचे भले होईल. या संत गाडगेबाबा यांच्या विचाराशी बांधिला असलेले मोहन विठ्ठल वाघमारे हे नेहमीच कांगठी गावातील लोकांच्या मदतीला धाऊन जात होते. उपवर मुला मुलींचे लग्न जुळवने, असे ते कामे करायचे पण या नियतीचा खेळ कोणास ठाऊक त्यांच्या या चांगुल पणाची त्यांनाही किमत मोजावी लागेल. हे त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. ज्या आरोपीने यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्याचा मोठा मुलगा शाळेत शिकत असताना हॉस्टेलची फिस भरण्यास पैसे नसल्या कारणाने त्याला शाळेतून काडून टाकले. तेंव्हा पैसा गोळा करण्यासाठी (आरोपी) वण वण भटकत होता. शेवटी मोहन वाघमारे यांनी त्यास उसने ५००० रुपये तत्काळ मदत केली. अश्या देव माणसावर आरोपीने धारधार शस्त्राने कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. सध्या त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हणमंत भुजंग वाघमारे अंदाजे वय ४७ वर्ष, शंकर भुजंग वाघमारे अंदाजे वय 46 वर्ष या दोघेजण गेल्या दोन ते तीन वर्षापासून पीडित मोहन विठ्ठल वाघमारे यांना जाणीवपूर्वक त्रास देत होते. मुख्य आरोपी हा अश्लील शिवीगाळ करत धमक्या द्यायचा. पिडीत मोहन विठ्ठल वाघमारे हे एका पायाने अपंग असल्या कारणाने ते घरीच बसून राहायचे, वयो मानानुसार त्यांची तब्येत बिघडायची खोकला, सर्दी यामुळे ते रात्रभर खोकत राहायचे हे ऐकून, पीडित वाघमारे यांच्यावर बीन बुडाचे खोटे आरोप करायचा. आरोपी हा शेळ्या राखत असल्यामुळे तो सोबत नेहमीच कुराड, कत्ती, ठेवायचा. याच कुर्हाड कत्तीने तुझे मुंडकेच तोडतो असे तो म्हणायचा तुझ्या एका पोराला खतंम केलो. आता तुझी बारी आहे तुला खतंम करे पर्यंत समाधान बसणार नाही अशा धमक्या ध्यायचा.
पीडित मोहन विठ्ठल वाघमारे यांना हे रोजचेच झाले होते, गेल्या ४ ते ५ वर्षापासून तो अशा धमक्या द्यायचा म्हणुन वाघमारे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे. कधी कधी कंटाळून गावातील प्रतिष्ठित वेक्तीना/पंचाना बोलाऊन त्याला असे करण्याचे कारण विचारायचे. विनाकारण का बोलतोस… असे बोलू नको… यामुळे तुझीच इज्जत चालली आहे. असे त्याला सांगितले की तो १ महिना चांगले राहायचा, महिन्या नंतर आपला तो धडा पुन्हा चालू करायचा. शेवटी मोहन वाघमारे यांनी नोव्हेंबर २०२२ रोजी रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बीट जमादार पठाण पोलिस गाडी घेउन आले, आरोपी हानमंत वाघमारे घरी नव्हता तेंव्हां बीट जमादार पठाण यांनी आरोपीच्या घरच्यांना समज दिली. पोलीस गाडी गेल्यानंतर आरोपीने गावात पोलीस गाडी आणला होतास माझे काय..? वाकडे केले का ? बाहेर गावाहून येऊन मला ठाणे दाखवतो असे म्हणून आरोपी पुन्हा धमक्या देऊ लागला.
शेवटी पोलिसांच्या निष्काळजी पनामुळे आणि समाज कंटकाच्या वाढत्या प्रभावामुळे जे व्हायचे ते घडले दिनांक २५-१२-२०२३ सकाळ पासून आरोपी हणमंत वाघमारे हा दारू पिऊन होता. शिव्या आणि धमक्यां देत होता दुपारचे ०३:३० वाजले होते गल्लीतील सर्व लोक शेतात कामाला गेली होती. मोहन वाघमारे यांची पत्नी शेतात गेली होती. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन संधी साधून शिव्यांचा भडीमार करत आरोपी हणमंत भुजंग वाघमारे हा शेतातून शेळ्या घेऊन आला. आणि हातात कुराड कत्ती घेऊन तडक मोहन वाघमारे यांच्या घरात घुसला. कॉलर धरून मारहाण करत फरफटत बाहेर आणला आणि बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. पीडित मोहन वाघमारे म्हणाले “मला का मारतोस…? माझ काय चुकलं सांग तर.. ? ते आधीच एका पायाने आपंग असल्यामुळे त्याच्या कुबड्या बाजूला पडल्यामुळे त्यांना उटता येत नव्हते. याचा फायदा घेऊन आरोपीने डोक्यात कुर्याडीचा घाव घातला. त्यांच्या मानेवर, हातावर, अपंग असलेल्या पायावर जबर मार दिला. हाताचे हाड तुटले, मोडलेल्या अपंग पायावर पुन्हा मार दिल्यामुळे तो पाय कमकुवत झाला.
रक्ताच्या थारोळ्यात मोहन वागणारे ओरडत होते मला वाचवा मला वाचवा..! असा आरडाओरड ऐकून आनंदा मरीबा वाघमारे, धम्मदिप नागोराव वाघमारे व धम्मोदय नागोराव वाघमारे यांनी आरोपींच्या तावडीतून मोहन वाघमारे यांची सुटका केली. पिडित मोहन वाघमारे यांना उचलून मेन रस्त्यावर ठेवले मोटार सायकल वरून दिलीप संभाजी वाघमारे व कुलदीप हानमंत वाघमारे हे रस्त्याने जात असताना पिडित मोहन वाघमारे रस्त्यावर पडलेले दिसले तत्काल कुठलाही विचार न करता मोटार सायकल वर बसवुन मोहन वाघमारे यांना ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे दाखल केले. मार गंभीर आसल्यामुळे नायगाव येथील डॉक्टरानी प्राथमिक उपचार केले. आणि पुढील उपचारासाठी तात्काळ अंबुलन्स करून विष्णुपुरी नांदेड येथील जिल्हा रुग्णालय पाठवले. दरम्यान पिडीत मोहन विठ्ठल वाघमारे यांच्यावर विष्णुपुरी जिल्हा रुग्णालय अतिदक्षता विभाग उपचार चालू आहे. आरोपी शंकर भुजंग वाघमारे व हानमंत भुजंग वाघमारे या नराधम समाज कंटकावर तत्काल कायदेशीर कडकं कार्यवाही करुन अटक करावी अशी पोलीस प्रशासनाकडे पिडित परिवाराने मागणी केली आहे.