नांदेडलाईफस्टाईल

न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा 18 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौरा

नांदेड। मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी शासन निर्णय दिनांक 7 सप्टेंबर 2023 अन्वये मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य हे समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेऊन भेट देणार आहेत. सदर समिती ही नांदेड जिल्‍हयात बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड जिल्‍हा दौऱ्यावर येत आहे. बुधवार 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, परीसर नांदेड येथे समितीची बैठक होईल.

नागरिकांना कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी अनुषंगाने पुरावे स्‍वीकारण्‍यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन येथील कॅबिनेट हॉल येथे व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षात कार्यालयीन वेळेत नागरिकांना त्यांच्याकडील कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राशी संबंधित उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्‍यादी पुरावे सादर करता येतील.

याचबरोबर ज्या व्यक्तींना मा. न्‍या. संदीप शिंदे (निवृत्‍त) व समिती यांच्‍या दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड जिल्‍हा दौऱ्यात प्रत्यक्ष निवेदन, पुरावे, सूचना द्यावयाच्या असल्यास नागरिकांना दुपारी 2 ते 4 यावेळेत सादर करता येतील. नियोजन भवन, कॅबिनेट हॉल, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे ही व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी वर नमूद केलेले राष्ट्रीय दस्ताऐवज, सनदी व नमूद पुरावे सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!