हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथे उष्माघाताने २४ वर्षीय तरुण युवकाचा मृत्यू
हिमायतनगर। उन्हाचा तडाखा वाढला असून, हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील एका नव युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. हि घटना दि. २९ सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली आहे. सध्या तालुक्यात 42 अंश सेल्सिअस डिग्री तापमान असून, उन्हाची दाहकता कित्येक पट्टीने वाढली आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. नागरिकांनी स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे सिरंजनी येथील परमेश्वर मल्लेश्वर दोंतूलवाड वय २४ वर्ष हा सोमवार दिनांक २९ रोजी अर्धापूर तालुक्यातील लहाण या गावी चारचाकी वाहन कारने गेला होता. कारमध्ये ( एसी ) वाताणूकुलीत पावर मध्ये जाणे येणे झाले. मुलगी बघून परत गावी सिरंजनी येथे आला. आणी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास आपल्या शेतात गेला होता. पाणी पिल्यानंतर अचानक पोटात, छातीत कळ येवून तो जागीच गतप्राण झाला. सध्या या भागात प्रचंड उन्हाचा कडाका वाढला आहे. ४१ डिग्री तापमान सोमवारचे होते. पोटात उष्णतामान वाढल्यानेच त्याचा मृत्यू झाला असल्याचे त्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.
तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चप्पलाचा वापर करावा, प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, व चेहरा झाकावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास अथवा होत असल्यास ओआर एस व तसेच घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचा नियमीत वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपन्ना, डोके दु:खी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसल्याची चिन्हे ओळखावीत चक्कर येत असल्यास तात्काळ डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. पुढील काळात उष्णतामान वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नखाते यांनी जनतेला केले आहे.