नांदेडसोशल वर्क

पोलीस अधिक्षक कार्यालयात स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

नांदेड। 31 ऑक्टोबर 2023 मंगळवार रोजी स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली.

श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. मा. पोलीस अधिक्षक साहेबांनी शपथेचे सामुहीकरित्या वाचान केले. या प्रसंगी मा. श्री. विजय धोंडगे, राखीव पोलीस निरीक्षक मा. श्री सुनिल निकाळजे, पोनि नियंत्रण कक्ष, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी यांचेसह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित राहुन “स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल या थोर पुरुषास अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन, सपोउपनि श्री सुर्यभान कांगणे, पोहेकॉ / संजय सांगवीकर, पोकों / श्री विनोद भंडारे यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!