केदारवडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी व तज्ञ डॉकटरांकडून उपचार आणि मार्गदर्शन शिबीर संपन्न..
उस्माननगर। महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य विमा योजना,राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक – (नाबार्ड) ,कृषी विज्ञान केंद्र, संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, भक्ती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व पटेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटल नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने केदारवडगाव ता.नायगाव (खै). येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि.२७ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सरपंच उषाताई चांदू गोरे.डॉ.सौ.माया मैदवाड डॉ.श्री.शाहीए.एस.चांद यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष तिरूपती दत्ता मालीपाटील होते. केदारवडगाव ता.नायगाव येथे नाबार्ड च्या सहाय्यातून हवामान बदल अनुकूल प्रकल्प प्रगतीपथावर असून या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक शेतीविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाद्वारे अवक्रमित मातीचे पुनर्वसन,बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती,भूसुधारणा आदी उपक्रमाचा समावेश आहे.
या शिबिराच्या प्रसंगी डॉ.श्री.शाहीए.एस.चांद यांनी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य विमा योजने विषयी सविस्तर माहिती उपस्थित दिली.म.ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेत एकूण ९४४ रोगाचे मोफत उपचार करण्यात येतात व हि योजना ज्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहे त्यांची नावे सांगून या योजनेविषयी कुठलीच शंका न बाळगता सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात अनेकांना औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये १८६ पुरुष, व महिला यांच्या तपासण्या केल्या. तर २२ जणांचे इसीजी काढण्यात आले. सदर शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.माया मैदवाड व डॉ.श्री.शाहीए.एस.चांद यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले भक्ती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व डायग्नोसिस सेंटर चे डॉ.दिनेश कुलकर्णी, डॉ.राजेश सुर्वे,अजय राठोड,सिमा शिरसे व पटेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर चे डॉ.सय्यद नौसिन,डॉ.स्वप्नील इंदुरकर,मुशरफ खान,प्रशांत मोरे आदींनी गावातील गरजू रुग्णांवर मोफत उपचार करून मार्गदर्शन केले. यामध्ये,रक्तदाब तपासणी व इतर सामान्य आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री गंगाधर कानगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले तर कृषी तज्ञ विजय बालाजी भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार गंगामणी अंबे यांनी मांडले.आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी किशन जाधव,चंद्रकांत बाबळे,रामदास बस्वदे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी श्री केदारेश्वर पाणलोट विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजी पाटील जाधव सदस्य उद्धव अंबाजी जाधव, लक्ष्मीबाई जाधव,गोविंदराव जाधव,बालाजी रामजी जाधव.प्रतिष्ठीत नागरिक शेषेराव योगाजी जाधव,लक्ष्मण बापूराव जाधव, काशिनाथ गोविंदराव जाधव,केरबा किशन तेंलगे,जळबा गोरे जिल्हा.प.प्रा.शाळेचे शिक्षक वृंद आदी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.