नांदेडमहाराष्ट्र

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत 9 डिसेंबर पर्यंत नमुना 6,7,8 करता येईल दाखल

नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्‍ह्यातील एकुण 9 विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी मतदान केंद्र, तहसील, उपविभागीय अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे पाहणीसाठी उपलब्ध आहे. याचबरोबर सदर यादी https://ceoelection.maharashtra.gov.in संकेतस्थळावर तपासणीसाठी उपलब्‍ध करुन देण्यात आली आहे.

सदर मतदार यादी तयार करण्याची अर्हता 1 जानेवारी 2024 निश्चित केली आहे. सद्स्थितीत मतदार यादीतील मतदारांना जर काही बदल करावयाचे असतील, मतदार यादीमध्ये एखादे नाव समाविष्ट करायचे असेल अथवा एखाद्या नोंदीच्या तपशीलाबाबत आक्षेप असल्यास असे दावे वा आक्षेप प्रारूप मतदार यादी 9 डिसेंबर 2023 (शनिवार) पर्यंत यथास्थिती नमूना 6,7,8 मध्ये दाखल करता येतील असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

सन 2024 मधील नंतरच्या अर्हता दिनांकाना म्हणजेच 1 एप्रिल 2024, 1 जुलै 2024 किंवा 1 ऑक्टोबर 2024 या दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनाही त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करता येईल. यासाठी नमुना 6 मध्ये त्यांचे दावे नोटीसच्या दिनांकापासून आगाऊ करता येईल व असे दावे त्या त्या तिमाहीच्या अर्हता दिनांकावर त्या त्या तिमाहीमध्ये विचारात घेऊन निकाली काढण्यात येतील. असे दावे किंवा आक्षेप उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालय किंवा उ‍पविभागीय अधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसील कार्यालयात वर दिलेल्या दिनांकापूर्वी पोहोचेल अशा रीतीने सादर करावा किंवा पोस्टाने पाठवावे.

नांदेड जिल्ह्यात मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत दिनांक 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत प्रत्‍यक्ष घरोघरी भेट देऊन मतदाराची पडताळणी करण्‍यात आली. जिल्हयात एकूण मतदार 26 लाख 68 हजार 279 असून पडताळणी केल्यानंतर ही संख्या 26 लाख 46 हजार 611 एवढी आली. घरोघरी जावून खातरजमा केल्याचे हे प्रमाण 99.19 टक्के आहे. जिल्ह्यात 30 हजार 56 मतदार आढळून आले नाहीत. 17 हजार 241 मतदार स्थलांतरीत झाले आहे तर सुमारे 34 हजार 216 मतदार मयत झाले. सुमारे 11 हजार 558 मतदारांचे छायाचित्र सुस्पष्ट करुन घेण्यात आले. दुबार नोंद झालेले 2 हजार 615 मतदारांची संख्या कमी करण्यात आली.

नांदेड जिल्‍ह्यात 18 ते 19 या वयोगटात नवीन 11 हजार 412 युवक मतदार आहेत. यात 3 हजार 887 मुली, 7523 मुले तर 2 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. एकूण मतदार संख्येत 18 ते 80 वयोगटातील मतदारामध्ये 13 लाख 82 हजार 214 पुरुष, तर 12 लाख 85 हजार 912 स्त्री मतदार संख्या आहे. तर 153 तृतीयपंथीयाची संख्या आहे असे एकूण 26 लाख 68 हजार 279 मतदारांची संख्या आहे.

मतदार यादीमध्ये एखादे नाव समाविष्ट करण्याबाबतचा दावा किंवा एखादे नाव समाविष्ट करण्यास अथवा एखाद्या नोंदीच्या तपशीलाबाबत आक्षेप असल्यास असे दावे वा आक्षेप 9 डिसेंबर 2023 (शनिवार) रोजी किंवा पर्यंत, यथास्थिती नुमना 6,7,8 मध्ये दाखल केल्‍यानंतर सदरील दावे व हरकती 26 डिसेंबर 2023 (रविवार) पर्यंत निकालात काढण्‍यात येतील. अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे व डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई 1 जानेवारी 2024 (सोमवार) पर्यंत करून मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2024 (शुक्रवार) रोजी करण्‍यात येईल.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!