उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड शहरातील नामांकित दवाखान्यात पेशंटला घेऊन आलेली प्रेयशी व तिच्या आई वडिलांच्या जाचाला कंटाळून नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक व डाॅ. ॠतूराज जाधव यांचे अंगरक्षक गोविंद मुंडे( वय ३७ )यांनी दि. २५/ १०/२०२३ रोजीच्या रात्री ९:३० च्या पूर्वी कलंबर शिवारात रोडलगत त्यांच्या जवळील पिस्तोलने हानवटीच्या खाली गोळी झाडून आत्महत्या केली . याप्रकरणी आरोपींना उस्माननगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सुत्रांनी सांगितले माहिती नुसार नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात डिवटीवर होते. नांदेड शहरातील नामांकित दवाखान्यातील डॉ ॠतुराज जाधव यांचे अंगरक्षक पो.ना. मुंडे यास वसमत येथील एक महिला दवाखान्यात मुलाला दाखवण्यासाठी येत असताना दोघामध्ये मैत्री जुळली . त्यानंतर मैत्री ही प्रेमात झाली आणि तिने लग्नाचा विचार केला. तिचे आई वडील नेहमी लग्न करण्यास वारंवार धमकी देत होते. पो.ना.मुंडे यांचे लग्न झाले असून, त्यांना एक मुलगी एक मुलगा आहे. सदरील महीला पोलिस नाईक मुंडे यांना लग्न करण्यास वारंवार धमकी देत होती. लग्न नाही केल्यास तुला सोडणार नाही. अशी वारंवार धमकी व त्रास देवून आत्महात्यास प्रवृत्त केले.
म्हणून पो.ना. मुंडे यांनी त्याच्या जवळील पिस्तोलने हानवटीच्या खाली गोळी झाडून आत्महात्या केली. म्हणून पोलीस स्टेशन उस्माननगर येथे सदरील आरोपीच्या विरोधात फिर्याद जान्वी गोविंद मुंडे यांच्या तक्रारी वरून आरोपींविरुद्ध १०५७/२०,२३, कलम ३०६ ,५०६,३४भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदरील आरोपीस पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सदरील घटनेचा तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवप्रकाश मुळे हे करित आहेत.