झरी खदान येथे शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक दुर्गा देवी महोत्सव मंडळाच्या देवीचे विसर्जन

नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या झरी खदान येथे नांदेड जिल्हा पोलीस व मनपा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक दुर्गा देवी विसर्जन झरी खदान येथे सायंकाळी ७ वाजेपर्यंत २२ दुर्गा देवी मुर्ती विसर्जन करण्यात आला होत्या, नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील सार्वजनिक दुर्गा मंडळ यांच्या समावेश होता ऊदया२६ आक्टोबर रोजी नवीन नांदेड भागातील दुर्गा देवी विसर्जन होणार आहेत.
गोदावरी नदी प्रदुषित होऊ नये यासाठी झरी खदान येथे दुर्गा देवी विसर्जन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्या नंतर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नांदेड शहरातील व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सार्वजनिक नवरात्र दुर्गा महोत्सव मंडळ यांच्या वतीने बसविण्यात आलेल्या दुर्गा देवी मुर्ती विसर्जन निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोबत यांचा मार्गदर्शनखाली ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार व मनपाचे सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजीराव कास्टेवाड,यांनी झरी खदान येथे पाहणी केली होती, या ठिकाणी स्ट्रीट लाईट, पोलीस बंदोबस्त, क्रेन व्यवस्था यासह जीवरक्षक दल व विसर्जन मार्गावर रस्ता दुरूस्ती करण्याची सूचना दिल्या होत्या.
२५ आक्टोबर रोजी दुर्गा देवी विसर्जन झरी येथे तयारी करण्यात आली होती, सकाळ पासूनच सार्वजनिक दुर्गा महोत्सव मंडळांनी आपल्या दुर्गा मुर्ती विसर्जन स्थळी आणल्या होत्या, क्रेन व जीवरक्षक दल यांच्या साहाय्याने खदान मध्ये या मुर्ती विसर्जन करण्यात आल्या यात ग्रामीण ५ व शहरी १७ अशा २२ मुर्ती सायंकाळी ७ वाजेपर्यंत झाल्या होत्या, सिडको शहरातील दुर्गा देवी विसर्जन २६ आक्टोबर रोजी होणार आहे.
विसर्जन स्थळी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे,कर निरीक्षक दिपक पाटील, सुधीर बैस, वसुली लिपीक मारोती सारंग,मालु एन फळे, प्रकाश दर्शने, मारोती चव्हाण, प्रभु गिराम, अंबटवार, सुर्यवंशी यांच्यी तर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माणिक हंबरडे व पोलीस अमलंदार यांच्यी उपस्थिती होती.
