नवीन नांदेड। सिडको परिसरातील प्रलंबित असलेला सिडको घर हस्ततांतरण यासह प्रलंबित असलेले अनेक प्रश्न सोडविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले, यावेळी ५१ फुटाचा रावणाचे दहन भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील हजारो नागरीक उपस्थिती होती.
विजया दशमी दसरा निमित्ताने २४ आक्टोबर रोजी भाजपा महानगर उपाध्यक्ष, तथा सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांच्या वतीने आयोजित ५१ फुटाचा रावणाचे दहन लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यी अध्यक्षस्थानी तर नांदेड शहर भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी महानगर अध्यक्ष प्रविण साले, नगरसेविका बेबीताई गुपीले,माजी नगरसेवकॲड. संदीप चिखलीकर,माजी सभापती आंनद पाटील शिंदे,माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे,सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका,भाजयुमो शहर अध्यक्ष बंटी मल्होत्रा,भाजपा अनुसूचित मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे, ॲड. दिलीप ठाकूर,जनार्दन ठाकूर ,शितल खांडींल, अनिल हजारी,धिरज स्वामी सौ.विजयाताई गोडघोसे,सौ.ललिता डेरनासे,यांच्या सह आजी माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यी उपस्थितीत होती.
यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सिडको हडको परिसरातील विकासासाठी वचनबद्ध असल्याचे सांगून सिडको प्रशासनाच्या मुळ घर धारकांच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरित प्रश्न निकाली काढण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले, तर भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुरते यांनी सिडको हडको चे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच मुबंई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक आयोजक वैजनाथ देशमुख यांनी केले यात सिडको प्रशासनाच्या वतीने मुळ घर धारकांच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरित प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तर अनेक मागण्या प्रलंबित असल्याचे सांगितले,तर सुत्रसंचलन नरेंद्र गायकवाड, प्रा.मधुकर गायकवाड, सिध्दार्थ धुतराज यांनी केले, यावेळी बंडा रवंदे प्रस्तुत स्वरचछंद प्रतिष्ठान यांच्या वतीने संगीत रंजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ५१ फुट रावणाचे दहन भाजपा नांदेड महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी फटाक्यांच्यी आतिषबाजी ढोल ताशा गजरात जय श्रीराम, घोषणा देण्यात आल्या, सिडको हडको परिसरातील व ग्रामीण भागातील नागरिक युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैजनाथ देशमुख मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.
यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, उपनिरीक्षक आंनद बिचेवार यांच्या सह अधिकारी पोलीस कर्मचारी , होमगार्ड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.