नवीन नांदेड। नवरात्र उत्सव निमित्ताने नवरात्रीच्या तिसऱ्या माळीच्या दिवशी अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडको नांदेड यांच्यावतीने उखाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
नागमणी गट्टावार वय 85 वर्ष यांनी उखाण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे , या स्पर्धेत परिसरातील अनेक महिलांनी सहभाग नोंदविला.
नवरात्र उत्सव निमित्ताने या उखाणे स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते,प्रथम नागमणी गटामणी तर जुने बाई, विजयाबाई, माधवी स्वामी बाई. श्रीमती शीतल या सर्वांनी उखाणे घेतल्या.
या संघाच्या अध्यक्षा भागीरथी बच्चेवार यांच्या हस्ते नागमणी गटावर यांचा सत्कार करण्यात आला.अनुसया महिला संघ कौठा, माऊली जेष्ठ नागरिक संघ एन. डी. ४१ सिडको, या संघटनेच्या महिलांनी स्पर्धेत सहभागी महिला व विजयी स्पर्धे यांच्ये अभिनंदन केले आहे.