नांदेड। शाळेत जाण्यासाठी घरून सायकलीवरून निघालेला मुलगा संध्याकाळी परत न आल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून या छायाचित्रातील १५ वर्षीय शिवराम चव्हाण हा मुलगा कोणाला आढळल्यास त्याची माहिती देणा-यास योग्य ते बक्षीस देण्यात येणार आहे.
नांदेड शहरातील चैतननगर भागात राहणारा शिवराज रामराव चव्हाण हा दहावीतील विद्यार्थी १२ आक्टोंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता शाळेत जाण्यासाठी आपल्या घरून निघाला. शिवाजी उच्चमाध्यमिक विद्यालय माणिकनगर नांदेड या शाळेत तो शिकतो.
शाळेचे नाव त्याच्या शर्टच्या खिश्यावर आहे. पाठीवर काळी बॅग आहे. रेड ब्लैक अल्फा रेजर सायकल आहे. हा मुलगा कोणाला आढळल्यास त्यांनी त्वरित विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड अथवा 9049789830, 9146650917, 7559496621, 9325572275 यापैकी कोणत्याही नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन रामराव चव्हाण यांनी केले आहे.