हदगाव तालुक्यात ऐन सणासुदीच्या दिवसात अवैध धद्यांच प्रमाण वाढलं
हदगाव| शहरासह तालुक्यातील वरळी मटका, तीरर्ट जुगार गुटखा देशी दारु व अवैध रेती या व्यवसायाने ऐन सणासुदीच्या काळात डोके वर काढलेले असुन याकामी पोलिसकडुन पण ठोस अशी कारवाई होत नसल्याने नागरिकांनी पणा अश्या अवैध धंद्याविषयी तक्रारी पण करणे सोडले आहे.
परिणामस्वरुप सध्या तरी हदगाव तालुक्यात अवैध धंद्याना सुगीचे दिवस आल्याचे दिसुन येत आहे यावर पोलिसानी ठोस अशी कारवाई होत नसल्याने हे सर्व होत असल्याचे दिसुन येत आहे. या मुळे सहज उपलब्ध होत असलेल्या अवैध देशी दारु मुळे युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. मटका जुगारात पैसे हारणा-याचा परिवारात ही कलह निर्माण होत असुन शहरासह परिसरात याशिवाय शांतता व कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याच दिसुन येत आहे.
वरिष्ठाचे आदेश ही पाळत नसल्याच स्पष्ट जाणवत आहे कारण हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशन अतर्गत उपविभागीय आधिकारी यांच्या पथकाने काही दिवसापुर्वी जुगार अड्यावर टाकलेली धाड हे एक ज्वलंत उदाहरण असुन रेती घाट बंद असुन ही आवैध रेती चढ्या भावाने सहज उपलब्ध होत आहे अवैध व्यवसायाचा ञास नागरिकांना होत आहे दारुड्याचा धुमाकूळ सुरु आहे हे सर्वकाही पोलिसांना माहीत असतांना ही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न सर्वसामन्य नागरिकांत चर्चिल्या जात आहे जेव्हा वरिष्ठ आधिका-याचे पथक येवून अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकतात यावरुन स्थानिय पोलिसांची कार्यशैली दिसुन येत आहे.