हिमायतनगर। वार्ड क्रं. 5 व 6 मधील रस्त्याच्या मधोमध असलेल्या जयभिमनगर मधील सिमेंट रोडचे बांधकाम नुकतेच सुरु केले आहे. पण तो रस्ता संपूर्ण गल्लीमध्ये होत नसून,अर्धवट केला जातो आहे.
अगोदरच या गल्लीत पावसाळ्यात आणि हिवाळा, उन्हाळ्यात रस्त्यावर नालीचे घाण पाणी येऊन रस्ता दुर्गंधीयुक्त व चिखलमय होतो. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण होतात. या गल्तीमध्ये रस्ता नसल्यामुळे आमच्याकडे संपूर्ण उतार होवून तिथे पाणी साचून पूर्ण घाणीचे साम्राज्य होते. आता अर्धवट रस्त्यामुळे आणखी समस्या निर्माण होणार आहे, तेंव्हा या भागातील रस्ता एकतर पूर्णपणे बांधून काढा नाहीतर अर्धवट रस्ता पूर्ण होऊ देणार नाही.
अशी मागणी या भागांतील म्हणजे वार्ड क्रं. 5 व 6 मधील रहिवासी प्रभात धोटे, सतिश पोपलवार, नदीम खान पठाण, संजय हनवते, धुप्पे प्रेमानंद, रंजीत धोटे, आक्रम खान पठाण, पिंटु हनवते, रामेश्वर नरवाडे, प्रमोद येरेकार, नागेश कांबळे, लक्ष्मण चव्हाण, जोत्स्ना खेडकर, प्रमोद धोटे, सुनिल घुले, अर्चना धोटे आदींनी निवेदन देऊन नगरपंचायत हिमायतनगर यांच्याकडे केली आहे.