सहशिक्षक कैलास गरुडकर यांचे निधन

कंधार। तालुक्यातील पानशेवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक कैलास गरुडकर (४५ वर्ष ) यांचे कर्करोगाने बुधवार दि.४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता रंगारगल्ली येथील रहात्या घरी निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून परिचित होते.
शिक्षक संघटनेच्या माध्यमातून अनेक शिक्षकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्यांच्या पाश्चात आई वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कंधार येथील स्मशानभूमीत गुरुवार दि. ०५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अंत्यविधी करण्यात आला. यावेळी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पुढारी, व्यापारी, शिक्षक, नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील हिरा गमावल्याची भावना यावेळी व्यक्त होत होती विविध शिक्षक संघटनेच्या वतीने कैलास गरुडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
