नांदेडसोशल वर्क

कंधार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर हजारोंच्या संख्येने धडकला आक्रोश मोर्चा

कंधार, सचिन मोरे। कंधार शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत मंजूर असलेल्या १०० फुटाच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून १०० फुटाचाच रस्ता करण्यात यावा, या मागणीसाठी मामा गायकवाड यांच्या अमरण उपोषनाला साथ देण्यात येत आहे.या उपोषणाला पाठींबा म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर साखळी पोषण करण्यात आले आहे.या अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ मागण्या मान्य करण्याच्या अनुषंगाने आक्रोश मोर्चाचे आयोजन करून,३ऑक्टोबर २०२३ रोजी निघालेल्या हजारोंच्या संख्येचा आक्रोश मोर्चा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयावर धडकला.

कंधार शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.२०२१ साली आयचर वाहनाच्या अपघातामध्ये पती-पत्नीला जीव गमवावा लागला.शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामास १०० फुटांची मंजुरी मिळाली आहे,आणि सदर रस्त्याची निविदाही निघाली.परंतू सदर रस्ता कमी करण्याचा प्रशासन प्रयत्न करत होते. ही बाब शहराच्या विकासाच्या दृष्टीने हितकारक नसल्याने माजी सैनिक संघटना व मातंग समाजाच्या वतीने या पूर्वी विरोध करीत आंदोलने, रास्ता-रोको करण्यात आले.

यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंधारने रस्ता १०० फुटाचा करण्याचे लेखी आश्वासनही दिले.परंतू त्यावर आज पर्यंत कसलीही कारवाई होत नसल्याने मामा गायकवाड यांनी दि.२७ सप्टेंबर २०२३ पासून आज तागायत अमरण उपोषण सुरूच आहे. या अमरण उपोषणाला पाठींबा म्हणून दि.२८ सप्टेंबर २०२३ पासून साखळी उपोषणासही सुरुवात करण्यात आली आहे. या आमरण उपोषणाला आमदार शामसुंदर शिंदे यांनी भेट देवून २ दिवसांत अतिक्रमण काढून १०० फुटाचाच रस्ता करण्याचे आश्वासन दिले.परंतू त्या गोष्टीलाही फारसे महत्त्व दिल्या गेले नाही.

त्यामुळे आज दि.३ ऑक्टोबर २०२३ रोज मंगळवारी सकाळी ११:०० वाजता शहरातील माईचे मंदीर येथून गांधीचौक-सराफालाईन- शिवाजी चौक मार्गे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय कंधार येथे हजारोंच्या संख्येत महिला,पुरुष आणि समाज बांधवांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चास कंधारच्या विकासासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांनी पाठींबा देऊन मोर्चात सहभागी झाले होते.प्रशासनाने या मोर्चाची चांगलीच धास्ती घेतली असल्याचे दिसून आले.प्रशासनाच्या वतीने मोर्चेकऱ्यांना परावृत्त करून आमरण उपोषण मागे घेण्यास विविध प्रकारच्या शकल लढवण्यात आल्याचे दिसून येत होते.

मामा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे महाराष्ट्र अध्यक्ष सतीश कावडे,बालाजी चुकलवाड माजी सैनिक संघटना संघटना जिल्हा अध्यक्ष नांदेड, शिवा नरंगले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड, सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायणराव गायकवाड, प्रितम गवाले, गंगाधर कोतेवार, पंकज गायकवाड,रेड पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष राजू मळगे, शिवराज दाढेल, सामाजिक कार्यकर्त्या साधना यंगडे,मास संघटनेचे नितीन तलवारे, परमेश्वर बंडेवार,सेवानिवृत्त इंजिनियर गोरे,पद्माकर बसवंते,परमेश्वर सूर्यवंशी,महेश मोरे,नितीन मोरे, साईनाथ मळगे,उद्धव वाघमारे, यांच्यासह हजारो समाज बांधव व भगिनी यांनी आक्रोश मोर्चात सहभाग नोंदविला आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!