नांदेड| शहरातील श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके व धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक पाऊल स्वच्छतेकडे या उपक्रमांतर्गत एक ऑक्टोबर रोजी दवाखानाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका तासाचे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सुरुवातीला उपस्थित सर्वांनी सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात नेहमी स्वच्छता राखण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची प्रतिज्ञा केली. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. साखरे आणि लायन्स सेंट्रलचे अध्यक्ष ॲड. उमेश मेगदे यांनी आपल्या भाषणातून स्वच्छतेचे महत्व विशद केले.राष्ट्रीय बेटी बचाओ, बेटी पढाओ फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ.सुनिता रघुनाथसिंह चौहान यांच्या तर्फे सर्वांना टोप्या वाटण्यात आल्या. यावेळी आयएमओ डॉ. अनुरकर, मेट्रन जाधव ,नागेश अटकोरे,समुपदेशक डॉ. कैलास चव्हाण,डॉ. पुष्पा गायकवाड, इंगळे सिस्टर, इंचार्ज सिस्टर नारवाड, पंडित सिस्टर, रेखा मुंढे, विद्या बापटे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सचिव शिवाजी पाटील, गौरव दंडवते, राम काळे ,शैलेश बोंदले, अरुण काबरा, सुनील साबू, शिवकांत शिंदे, दीपेश छेडा यांनी देखील स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.