नांदेड। श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर, यांनी जिल्हयातील अभिलेखावरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाया करण्याच्या सुचना गुन्हे बैठकीमध्ये दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वजीराबाद हद्दीतील अनेक गुन्हेगारांविरुद्ध पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाने कार्यवाही केली होती.
पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड हद्दीमध्ये टोळीप्रमुख मोहीत उर्फ चिकु पिता रमेश गोडबोले रा. देगावचाळ नांदेड व त्याचे साथीदार तेजस उर्फ तेजा पिता प्रदीप मोदकुलवार, रा. बफना नांदेड. प्रथमेश उर्फ मोनु दिपक सुर्यवंशी, रा. शिवशक्तीनगर, नांदेड प्रथमेश मिलींद कापुरे, रा. बौध्दविहाराजवळ नांदेड, अजय गौतम थोरात रा. आंबेडकरनगर नांदेड, सचिन सुभाष नरवाडे, रा. देगावचाळ नांदेड यांनी आपली स्वतः ची गुन्हेगारी टोळी तयार करुन विविध प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे उघडकीस आल्याने त्याचेविरुध्द पोलीस ठाणे वजीराबाद, नादेड येथुन कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे हदपारीचा प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक, नांदेड यांचेकडे पाठविण्यात आला होता.
सदर कार्यवाहीमध्ये मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी सदर टोळीतील सदस्यांविरुध्द प्रतिबंधक कार्यवाही प्रकरण चालवून टोळीतील प्रमुख व सदस्य गुन्हेगारांना नांदेड जिल्हयाचे हद्दीतून सहा महीने कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले बाबतचे आदेश पारीत केले. सदर आदेशात नमुद असलेले गुन्हेगार अजय गौतम थोरात व प्रथमेश मिलींद कापुरे यांना सदरची हद्दपारीची नोटीस तामील करून त्यांना नांदेड शहरातुन हद्दपार करून परभणी जिल्हयामध्ये नेऊन सोडण्यात आले होते.
आज दिनांक 30.09.2023 रोजी सदर गुन्हेगार टोळीमधील गुन्हेगार नामे प्रथमेश उर्फ मोनु दिपक सुर्यवंशी रा. शिवशक्तीनगर नांदेड हा मिळुन आल्याने त्यास सदरची नोटीस तामील करून त्यास नांदेड शहरामधुन हद्दपार करुन परभणी शहरामध्ये सोडण्यात आले असुन सदर गुन्हेगारांना सहा महीण्याचे कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला आवाहण करण्यात येते की, सदर हद्दपार ईसम हा नांदेड शहर व नांदेड जिल्हात आढळुन आल्यास खालील संपर्क क्रमांकावर कळविणेस विनंती करण्यात आली आहे. पो.स्टे. वजिराबाद कार्यालय नंबर 02462-2236500, मा. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड -9823333377 03. मा. सहा. पोलीस निरीक्षक, शिवराज जी. जमदडे, 9890396652, पोलीस हेल्प लाईन क्रमांक 112 वर संपर्क करावा. उर्वरीत प्रलंबीत प्रस्तावातील जास्तीत जास्त गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कार्यवाही पोलीस विभागाकडुन करण्यात येत आहेत.