नांदेड। नॅशनालीस्ट कंज्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन अर्थात राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी दत्ता गोविंदराव मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण कल्याण अधिकार अधिनियम 1986 नुसार आपल्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी ही नियुक्ती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समिती ही कोणत्याही ग्राहकाची होणारी फसवणूक टाळणे, कोणत्याही वस्तुमध्ये होणारी भेसळ उघड करणे, सरकारच्या ग्राहक संरक्षण खात्याकडून वेळोवेळी निघणार्या ग्राहक हिताच्या जी.आर. निर्णयांची जनजागृती करून लोकांना माहिती देण्याचे कार्य करते. प्रसंगी ग्राहकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा देते. राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी दत्ता गोविंदराव मोहिते यांची निवड करण्यात आली असून जिल्हा, शहर, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर पदाधिकारी निवड करून शाखा निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दत्ता मोहिते यांची निवड झाल्याबद्दल नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी संचालक अविनाश कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव लालुजी मोहिते, स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष माधव देवसरकर, दै.समीक्षाचे संपादक रूपेश पाडमुख, दिलीपराव माहुरे, महमद आरेफ खान पठाण, नामदेवराव मोहिते, भानुदास जाधव, सुभाष पाटील, व्यंकटी दुधंबे, शिवराज चाडावार, अविनाश जोशी, अरूणा पुरी,सुनिता बेरूळकर, श्रीराम सुंकेवार, मिलींद चावडे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.