हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम सण 2021- 2022 मध्ये खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अक्षरशा शेतकऱ्यांच्या हाताचे सर्व हगाम गेला. तरीसुद्धा तालुक्यातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून शासन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज शेकडो शेतकर्यांनाही हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा हककच्या मोबदल्याची सर्व शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीने कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. सण 2021- 2022 मध्ये नुकसान होऊनही अद्यापही शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांना विमा मिळाला मात्र तोही तुटपुंज्या प्रमाणात आहे, त्यामुळे उर्वरित शेतकरी पीकविमा कधी मिळेल या प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या आदेशानेच शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता, मात्र पिक विमा भरून नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळत नसेल तर पीक विमा भरून काय फायदा असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
तर विमा कंपनी शेतकऱ्यांना वेठीस धरून हुकूमशाहाची पद्धतीने शेतकऱ्यांचा विम्याचा पैसे दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून दिसते आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक अतिवृष्टीने नुकसानीत आले, त्यानंतर लष्करी आळीनें उरलेली पिके फसत केली. आधीच मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची औषध फवारणी केली, यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडल्या गेला आहे. अश्यात शेतकऱ्यांना पिकविम्याच्या बदल्यात नुकसान भरपाई मिळणे आवश्यक होते. मात्र दोन वर्षापासून शेतकरी पीक नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.
हि बाब लक्षात घेता संबंधीत पीक विमा कंपन्यांना माहिती घेऊन चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विम्याची भरपाई मिळवुन द्यावी. जर आठ दिवसात कोणतीही मदत मिळाली नाही तर तहसिल कार्यालय हिमायतनगर समोर सर्व शेतकरी आमरण उपोषणाला बसतील याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी व पत्रकारांना देण्यात आले आहे. यावर हिमायतनगर शहरासह तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.