श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| गेल्या पंधरवड्या पासून रिमझिम पाऊस सुरू आहे. या संतधर पावसाने माहूर तालुक्यातील मौजे कुपटी ते दहेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील नळकांडी बुटक्या फुलांवरून पाणी वाहत असल्याने वारंवार मार्ग बंद पडतो आहे. पुलाची उंची वाढविली नसल्याने पंधरा दिवसात तीन ते चार वेळा या गावांचा संपर्क तुटत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेत या नळकांडी बुटक्या फुलाची उंची वाढवावी. अशी मागणी निवेदनाद्वारे दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते परसराम पारडे यांनी केली आहे.

माहूर तालुक्यातील मौजे कुपटी पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेगाव आणि गावा लगत गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे थोडा जास्त पाऊस झालातरी या नळीकांडी बुटक्या पुलावरून पुराचे पाणी जात आहे. हा पुर उतरण्याकरिता तासांन तास वाट बघावी लागत आहे. विशेष म्हणजे हे गाव साकुर दहेगाव शिरंजनी असे तीन गावाची गट ग्रामपंचायत असल्यामुळे साकुर वरून दहेगावला जाण्याकरिता एकच मार्ग आहे.

हाच एकमेव मुख्य रस्ता असल्याने दरवर्षी या पुलावरून जास्त पाऊस झाला की पुराचे पाणी जात आहे. याकरिता दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते परसराम पारडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग माहुर यांनी पुलाची उंची वाढवून दोन्ही बाजूचे रस्ते मजबूत करावे असे निवेदन दि 9 रोजी लेखी दिले आहे.

