हिमायतनगर| भारत देश हा जगामध्ये कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातो.त्यामुळे मुख्य व्यवसाय शेती असल्याने शेतीचे उत्पन्न कसे वाढवता येईल या दृष्टीकोनातून शेतकरी शेतातील पिकांवर घातक किटकनाशक ,तणनाशक अति वापर करत असून येणाऱ्या काळात कर्करोग सारख्या घातक रोगांचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी शेंद्रीय औषधी, खतांचा वापर करून शेती करावी कारण येणाऱ्या काळात कर्करोग सारख्या घातक रोगांपासून आपले व देशातील नागरीकांचं आरोग्य कसं सुरक्षीत राहिल याची दक्षता घ्यावी तसेच शेतीची पोषकता कमी होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.

त्याचबरोबर शेतामधील बांधांवर झाडांची लागवड करावी.त्यामध्ये आंबा, पेरू, चिकू इत्यादी फळांची लागवड करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतात. जर शेतामध्ये झाडे असतील तर त्यावर बसणारे पक्षी चिमणी, पारवी, चारी सारखे पक्षी बसतात त्यामुळे शेतातील पिकांवर पडलेल्या आळ्या हे पक्षी खातात. एकंदरीतचं पक्षी हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. घातक किटक नाशक, तणनाशकांचा अति वापर टाळावा तसेच झाडे तोडून पक्षी नष्ट करू नका असे उपविभागीय कृषि अधिकारी राजकुमार रणवीर यांनी पळसपूर येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी भाग २ अंतर्गत लोकसहभागीय पद्धतीने नियोजन करणे, गावस्तरीय नियोजन आराखडा तयार करणे या कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते वेळी बोलत होते.

पक्षांना शत्रू मानून शेतकऱ्यांनी शेती करू नये कारण पक्षी नसतील तर शेतकऱ्यांच उत्पन्न कसे घटते व देशात कसा दुष्काळ पडते. याचे चिनच्या सरकारने १९५८ रोजी देशातील सर्वच पक्षी नष्ट करून शेती पिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तेथे जगातील सर्वात मोठा दुष्काळ पडल्याचे उदाहरण दिले. तात्पर्य सांगायचे असे की. घातक औषधी पिंकावर फवारणी करून पक्षांचे जीवन नष्ट करू नका. पक्षी शेतातील पिके वाचवण्यासाठी किती महत्वाचे आहेत. एकंदरीतच शेतातील विकांवर घातक किटक औषधी फवारून कर्करोगला कसे आमंत्रण देत आहोत असे डॉ. प्रताप परभणकर यांनी कार्यक्रमावेळी विचार मंचावरून शेतकऱ्यांना सांगितले.

पुढे बोलतांनी त्यांनी कर्करोगा विषयी विस्तृतपणे शेतकऱ्यांना माहिती दिली. कर्करोगाला घाबरून जाऊ नका, काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या. कर्करोगावर पहिल्या टप्प्यात उपचार घेतला तर तो बरा होऊ शकतो. त्यामुळे कर्करोग झाल्यास घाबरू नका. विशेष त्यांनी कर्करोगाच्या बाबतीत महिलांनी जागरूक असले पाहिजे, कारण महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असून स्तनामध्ये लहाणशी गाठ आढळून आली तरी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा. तसेच कर्करोगाचे प्रकार किती आहेत हे देखील यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांनी पिकांवर घातक औषधी वापरणे बंद नाही केले तर देशात कर्करोग येणाऱ्या काळात घराघरात पोहचेल याची डॉ. विकास वानखेडे यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले उपविभागीय कृषि अधिकारी राजकुमार रणवीर, डॉ. प्रताप परभणकर साहेबांनी सांगीतलेल्या सुत्रांवर चालले नाही तर देशातील प्रत्येक गावात कर्करोगाने मृत्यु पावणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असेल.
यावेळी विचार मंचावर कृषि अधिकारी बालाप्रसाद बंदेल, माजी सभापती डॉ. प्रकाश वानखेडे, माजी सभापती वामनराव वानखेडे, डॉ. गोविंद वानखेडे, सरपंच लक्ष्मण मांजरे, कृषि सहायक हनुमंत नंदनवार, ग्रामसेवक शिरारपल्लू, कृषि मित्र कल्याण वानखेडे, उपसरपंच गजानन देवसरकर, ग्रा. पं. सदस्य संजय वानखेडे, माजी सरपंच मारोती वाडेकर, माधव देवसरकर, दिगांबर वानखेडे, , नागोराव वानखेडे, संदीप वानखेडे, पत्रकार दाऊ गाडगेवाड यांच्यासह कृषि कर्मचारी , गावातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषि अधिकारी निलेश वानखेडे यांनी केले तर सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार नागोराव शिंदे यांनी केले.
