हदगाव/हिमायतनगर/नांदेड| अवैद्य रेतीसाठे जप्त करून घरकुल धारकांना मोफत वाळू वितरित करण्याची मागणी केल्याचा राग मनात धरून हिमायतनगर तालुक्यातील विरसनी येथे वृत्तसंकलन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांस राजकिय वरद हस्त असलेल्या रेफिमाफियाने जबर मारहाण करून दोन मोबाईल फोडून, नुकसान करत सोन्याची चैन हिसकावून घेऊन अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात प्रमुख दोन आरोपीसह ईतर 8 ते 10 जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी रेतीसाठे जप्त करण्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर हल्ले होत होते. आता मात्र वाळू माफियानॆ थेट पत्रकारावर हल्ला केल्याने शासनाने रेती माफियांना आवर घालण्यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील मागील दोन वर्षपासून हिमायतनगर तालुक्यातील एकाही रेतीघाटचे लिलाव झाले नाही. असे असताना देखील राजकीय वरदहस्त आणि अल्पवहडीत मालामाल होऊ पाहणाऱ्या काही रेती माफियांनी मौजे विरसणी, कामारी, जवळगाव, पिंपरी, दिघी, घारापुर, खडकी, डोल्हारी, धानोरा, पळसपूर, वारंगटाकळी, मंगरूळ, कोठा, हिमायतनगर रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात विना परवाना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून हजारो ब्रास वाळूचा साठा महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून केला आहे. त्यामुळे गरजू लाभार्थीना अव्वाच्या सव्वा दराने रेती खरेदी करावी लागत आहे. हि बाब लक्षात घेऊन हदगाव तालुक्यातील आष्टी येथील पत्रकार गजानन जिद्देवार वय 34 वर्षे यांनी मागील महिन्यात हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे तक्रार देत अवैद्य रेती साठे जप्त करून सादर रेती शासनाच्या योजनेनुसार घरकुल धारकांना मोफत देण्यात यावी अशी रास्त मागणी केली होती.

याबाबत कर कर्त्यालाही झाली कि नाही, याची माहिती घेण्यासाठी दिनाक 06 जून 2025 रोजी हिमायतनगर तहसिल कार्यालयात विचारपूस केली. कार्यवाहीबाबत माहिती मिळत नसल्याने त्यांनी माहीती अधिकार अर्ज दिला आणि विरसणी मार्ग हदगावकडे निघाले. विरसणी येथे अवैद्य वाळू साठा शासनाच्या ताब्यात घेवुन गरीब घरकुल धारकास मोफत देण्यासाठी लिलाव आयोजित केल्याचे समजल्याने विरसणी येथे पत्रकार गजानन जिद्देवार हे त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले होते. येथे महसुलाचे काही तलाठी, पोलीस पाटील, रेतीचा अवैद्य धंदा करणारे लोक व सात ते आठ ट्रक्टर व घरकुल लाभार्थी तहसीलदार यांची वाट पाहत जमले होते.

या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या वाळुच्या ढिगाऱ्याजवळ जावुन आष्टी येथील पत्रकार गजानन जिड्डेवार वाळु साठ्याचे फोटो व व्हिडीओ काढत असताना वाळु माफिया तथा शिवसेना शिंदे गटाचा युवसेना अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख अफरोज याने येऊन आमच्या विरोधात तक्रार देणारा तुच पत्रकार आहेस का..? अशी विचारणा केली. एव्हढेच नाहीतर तुझा तालुका सोडुन आमच्या तालुक्यात येवुन शाहनपणा का..? करतोस तुला खतम करतो. असे म्हणत पत्रकारांशी हुज्जत करत गालावर चापट मारली, त्याचे सोबत असलेला सोनु देवसरकर याने वाळू माफियानी बाजुला असलेल्या लाकडानी पत्रकारांच्या दोन्ही पायाच्या मागील बाजुस मारहाण केली. यात पत्रकारांस मुक्कामार लागुन वळ आल्याने ते खाली पडले. तेथे हजर असलेले आठ ते दहा अनोळखी इसमानी देखील पत्रकारांस लाथा बुक्यानी आणि दंड हाथात घेऊन जबर मारहान केली. वाळू माफियानि बाजूला असलेल्या ट्रैक्टर अंगावर घालण्याचा व जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
स्वतःच्या बचावासाठी पत्रकार गजानन जिद्देवार बाजूला होताच वाळूमाफिया शेख अफरोज व सोनु देवसरकर यानी अंगावर बसुन पोटात व अंगावर लाथा बुक्यानी मारहान केली तसेच 40 हजार रुपय किमतीची गळ्यातील सोन्याची जुनी वापरता चैन हिसकावुन घेतली. तसेच हातातील दोन मोबाईल घेवुन दगड मारून फोडून 60 हजार रुपयाचे नुकसान केलं. एवढ्यावरच नाही तर झालेली झटपट व मारहाणीत खिशातील 5 हजार रुपये खाली पडल्याचे पत्रकार गजानन जिद्देवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. यावरून हिमायतनगर पोलिसांनी वाळूमाफिया तथा युवासेना अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख अफरोज व सोनु देवसरकर या दोघांसह इतर अनोळखी आठ ते दहा जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 119(1), 116(1), 115(2), 351(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 324(4), 324(5) अनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मद्दे हे करत आहेत.
आरोपी अद्याप ही फरार
मराठी पत्रकार संलग्न डिजिटल मीडिया परिषद हदगाव पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गजानन जीदेवार यांच्यावर भ्याड हल्ला करणारे आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी. व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास यावा. सदर घटनेचा निषेध नोंदवून मराठी पत्रकार संलग्न डिजिटल मीडिया परिषदचे हदगाव तालुकाध्यक्ष मारुती काकडे , महेंद्र धोंगडे व तसेच मराठी पत्रकार संघाचे वतीने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे.
