Sant Vachanamrut : संतवचनामृत मंडळाच्या वतीने ‘क्षीरसिंधु परिसरी’ प्रवचनमालेचे आयोजन

नांदेड| संतवचनामृत मंडळाच्या वतीने १४ ते १६ फेब्रुवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत अशोकनगर हनुमान मंदिर येथे सद्गुरू श्री गुंडा उर्फ चंद्रशेखर एकनाथ महाराज देगलूरकर यांचे क्षीरसिंधु परिसरी प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
मनुष्य जीवनात सद्गुरूंचे महत्व संत महात्म्यानी उपदेशिल्याप्रमाणे आत्मकल्याणाचे साधन असलेल्या या पारमार्थिक विषयावरील सद्गुरू श्री गुंडा उर्फ चंद्रशेखर एकनाथ महाराज देगलूरकर यांचे क्षीरसिंधु परिसरी प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठाचे पूजन मनोज गुरु यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या प्रवचनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संतवचनामृत मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मणराव ठक्करवाड ,कार्याध्यक्ष संतोष कुलकर्णी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत लोकमनवार, उपाध्यक्ष विरेश शाहू सचिव शुभम येरमवार ,सहसचिव सूरज भोकरे,कोषाध्यक्ष गणेश चैनपुरे, सहकोषाध्यक्ष सचिन पानकर, ज्ञानेश्वर रामोड, शैलेश पटवेकर यांनी केले आहे.
