कै. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्त हडको परिसरातील रामजी पाटील नगरीत वृक्षारोपण
नवीन नांदेडl कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने माजी नगरसेवक संजय इंगेवाड यांच्या पुढाकाराने हडको येथील रामजी पाटील नगरीत मान्यवरांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.
१४ जुलै शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने माजी नगरसेवक संजय इंगेवाड यांच्या पुढाकाराने साठ वृक्ष लागवड हडको भागातील रस्ता दुतर्फा परिसरात आयोजित करण्यात आला होता, प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले,यावेळी नांदेड भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड,माजी नगरसेवक राजु पाटील काळे,सिध्दार्थ गायकवाड, ऊदय देशमुख, डॉ. विजयानंद भौग,डॉ.बाबुराव ढगे,भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाबासाहेब इंगेवाड, सेवानिवृत्त अधिकारी वन अधिकारी काशीराम काळेवाड, डॉ.अशोक कलंत्री,गिरीधर मैड,दलित मित्र नारायण कौलंबीकर, माधव डोमपंले,दलित मित्र माधव अंबटवार, बालाजी रहाटकर, गजानन कहाळेकर सतिश बसवदे, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,
अर्जुन बागडी,चेअरमन दिगंबर घोगरे,यांच्या सह पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय इंगेवाड यांनी रस्त्याचा दुतर्फा वृक्षारोपण करणे हे माझी इच्छा असल्याचे सांगून कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती दिनी कै.रामजी पाटील इंगेवाड परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले, सुत्र संचालन राजु लांडगे, तर उपस्थित मान्यवराचे व पत्रकार बांधवाचे स्वागत प्रमोद काळेवाड,आनंदा घोगरे,राजु इंगेवाड,शिवाजी इंगेवाड,प्रितम लिबेकंर,
देबडे,गजानन उतरवार, सुरज इंगेवाड,यानी केले.
या सोहळ्याला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी रस्त्याचा दुतर्फा साठ वृक्ष लिंब, अशोक व विविध जातीचे वृक्ष लावण्यात आले.