नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि. ६ जून रोजी ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, वित्त व लेखाधिकारी महमद शकील, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी.एम. खंदारे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक, डॉ. शैलेश वाढेर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनायक जाधव, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, हुशारसिंग साबळे, मेघश्याम सोळंके,
विधी अधिकारी डॉ. विनायक भोसले, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, सहा. कुलसचिव डॉ. सरिता येन्नावार, रामदास पेदेवाड, रवि मोहरीर, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, विद्युत उपअभियंता अरुण धाकडे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे यांच्यासह विद्यापीठातील संचालक, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शेवटी महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.