नांदेड/नायगाव। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात येणाऱ्या मौजे लघूळ येथील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेले आणि नायगाव तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथे तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या जबाबावरुन सुजलेगाव येथील सहा तरुणांवर बिलोली पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. त्यापैकन आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे लघूळ येथील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून दि. ३१ मे रोजी रात्री पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मुलीच्या आईने दि. १ जुन रोजी बिलोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आणि सुजलेगाव ता. नायगाव येथील हनमत माधव बनकर याने पल्सर मोटार सायकलवरुन माझ्या १३ वर्षाच्या मुलीस काहीतरी फुस लावून पळवून नेल्याचे नमूद केले. त्यावरून फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दि. ३१ मे रोजी रात्री पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस दि. १ जुन रोजी रात्री उशिरा घुंगराळा येथे सोडले. मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात नातेवाईक शोध घेत होते. पण पळवून नेलेल्या तरुणानेच चोवीस तासानंतर घुंगराळा येथे सोडले. त्यावेळी ती मुलगी घुंगराळा येथे आपल्या बहीणीकडे गेली. तिथे झाल्या प्रकाराबद्दल विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी दि. २ जुन रोजी बिलोली पोलीस ठाणे गाठले व तिथे पिडीत मुलीने पोलीसांना जबाब दिला. यात तिने आपल्यावर सुजलेगाव व नायगाव येथील एका व्यक्तीच्या रुमवर नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. आणि संबधीतांचे नावेही पोलिसांना सांगितले.
पिडीत मुलीने दिलेल्या जबाबावरुन हनमंत माधव बनकर, अभिजात प्रल्हाद देवाले, पृथ्वीराज दिगांबर आईलवार, प्रविण लक्ष्मण नेहरु, संदेश इरवंत पवार आणि प्रेम गणेश बोमलवार यांच्या विरोधात २७६ व पोस्को गुन्ह्याचे कलम लावण्यात आले. यातील हनमंत बनकर, प्रविण नेहरु आणि संदेश पवार या तिघांना बिलोली पोलिसांनी अटक केली. तर उर्वरीत तिघे जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
गुन्हा नोंद झाल्यावर आरोपींना अटक करण्याऐवजी तिघांना जाणीवपूर्वक मोकळे सोडले असल्याचा आरोप होत आहे. फरार आरोपींना अटक करण्यात येवू नये यासाठी काही राजकीय मंडळी हस्तक्षेप करत असून पिडितेच्या कुटुंबीयावर दबाव आणल्या जात असल्याची चर्चा नायगाव, बिलोली तालुक्यातील जनतेतून होत आहे.
या प्रकरणातील तिघां अटक आरोपितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार करत आहेत.