घरोघरी श्रावण बाळासारखी संतती प्राप्त झाल्यास कुठेही वृद्धाश्रम स्थापन करण्याची गरज पडणार नाही. अशी स्थिती बिलोली शहर आणि तालुक्यात दिसून येत आहे. यासाठी काही भारतीय कुटुंब व्यवस्था सांभाळणारे युवक आणि प्रौढ सुजाण ग्रामस्थ पुढे येताना चे चित्र दिसून येते आहे
बिलोली शहरातील *सन्मान माई चा* कार्यक्रमापाठोपाठ गागलेगाव येथील शेतीनिष्ठ शेतकरी जे अर्धा दिवसाची शाळा करणारे, जीवनाची शाळा सफलतेने करत, सुयोग्य संततीमुळे 50 वर्षापूर्वी प्राप्त / अप्राप्त सौख्य आता मिळवत आहेत. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागलेगाव या गावात श्रीमान विठ्ठलराव बुद्धलवाड (गागलेगावकर) नावाचे शेतकरी कुटुंबातील अत्यंत बिकट परिस्थितीत साधी राहणे आणि सतत शेती काम असे जीवन जगत.
सामान्य कुटुंबातील दाम्पत्याचा आयुष्यभराच्या प्रामाणिक मेहनतीला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या 50वा सुवर्ण महोत्सव विवाह सोहळाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम आयोजित केला आहे या 50व्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त त्यांची सामाजिक बांधिलकी जपत विवाह सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यात सर्व गावातील 600 कुठुंबाला मूळ-पत्रिका, स्नेह आहेर, आई-वडिलांचा सन्मानार्थ तुळा-पुजा करून शालेय साहित्य / गूळ / नारळ हे साहित्य तथा गरजू विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप केले जाणार आहे व हिंदू धर्म परंपरेनुसार आई वडील हेच आपले दैवत मानून त्यांच्या या 50व्या विवाह सोहळ्यानिमित्त यवतमाळ येथील प्रसिध्द ह.भ.प. कु. कांचनताई शेळके यांचे हरिकीर्तनाचा व हरिजागराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
हा विवाह सोहळा एक अविस्मरणीय क्षण असणार असून स्वतःच्या संततीने व गावकऱ्यांनी या अजातशत्रू सुखी दाम्पत्याच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची निमित्ताने जणू पुन्हा एकदा विवाहबद्ध होण्याच्या संकल्पनेचा सारीपाटच, स्वप्नसारखा सत्यात उतरणार आहे, एक उल्लेखनीय बाब म्हणजे यात नवं वर-वधूप्रमाणे लग्नाची एकूण 21 प्रकारची सर्व दागदागिने, पैठणी, शाही वस्त्रलंकार, शेरवानी – फेट्यासह, विवाहाची सर्व विधी, शेवंती, घोड्यांची वरात, ऑर्केस्ट्रा मंगलाष्टके, नारळी कल्याण मंडप, विधिवत पूजन, सर्वकाही यथोचित व विधिविधानाप्रमाणे केलं जाणार आहे हा विवाह सोहळा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे, विशेष बाब म्हणजे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना मानाचे फेटेचा आहेर, नांदेड येथिल वकील मंडळींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
त्यातच गावातील हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देखील दिसणार आहे तो म्हणजे गावातील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना याच परिवाराकडून ताजटोपी देऊन त्यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. शेवटी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चा प्रत्यय आणि या दांपत्याच्या आयुष्यभराच्या प्रामाणिक मेहनतीला, पाल्य /गावकऱ्यांकडून अभिवादन होत असल्याचे या 50 व्या सुवर्ण महोत्सवी विवाह सोहळ्यात दिसून येत
गाव आणि शेती याबाबत आत्मीयता बाळगणारे श्रीमान विठ्ठलराव व श्रीमती राजाही हे दाम्पत्य शेतात राब राब राबायचे. काळया मातीने सुद्धा कष्टाला बरकत देऊन कुटुंबातील दीड एकर शेतीला 35 एकर शेतीपर्यंत नेऊन पोहोचवले. केवळ कष्टकऱ्यांना व्यवहार कळतच नाही. तसे व्यवहारापेक्षा कष्टाला महत्व देणारे श्रीमान विठ्ठलराव यांना अर्धांगिनी श्रीमती राजाई या व्यावहारिक ज्ञानासह प्राप्त झाल्यामुळे कष्टाला व्यवहाराची जोड लागली. संयुक्त कुटुंब चांगली प्रगती करत असताना 1985 साली या दाम्पत्याला एकत्रित कुटुंब पद्धतीतून विभक्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी घरातील सोने नाणे आणि रक्कम वाटून घेण्याचा योग आला तर अजूनही गावात चर्चा आहे की, त्या काळी सोने वाटून घेणारे हे गावातील एकमेव कुटुंब होते, त्यातच जवळपास नगदी 55 हजार रुपये वाट्याला आले, हीच त्यांच्या आयुष्यातील कष्टाची प्रचिती होती, शिवाय केवळ मेहनत करणे ही बाब निपुणतेने करणाऱ्या या दांपत्याला विभक्त झाल्यानंतर गृहपयोगी पहिला किराणा सामान भरताना दीडशे रुपयाचा खर्च आला आणि तेव्हा एका वेळच्या किराणाला एवढे पैसे लागतात हा व्यवहार कळला, त्यावेळी खरे कळाले की, संसार आणि व्यवहार काय राहतो. त्यातच पत्नी सौभाग्यवती राजाई सोबत असल्यामुळे हा त्रास, त्रास न वाटता जीवनाचा प्रवास वाटून गेला.*तुका म्हणे जाणले तर बायको नवऱ्याची माय* याची कल्पना अनुभूती असलेल्या श्रीमान विठ्ठलराव यांनी आपल्या पत्नीवर आयुष्यभर आणि आज तागायत निर्भेळ प्रेम केले. त्यांचे जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अखंड प्रेम हे विविध बाबीने स्पष्ट होते. प्रसंगनिष्ठ सांगायचे तर 2016 सालि अर्धांगिनी या कॅन्सरने पीडित असताना पती म्हणून जी पत्नीचे सेवा, शुस्रूषा केली ती क्वचितच पुरुषप्रधान संस्कृतीत पत्नी विषयी केलेली आढळते. श्रीमान विठ्ठलराव आणि श्रीमती राजाई यांच्या निखळ प्रेमामुळे पत्नी सौ. राजाई ह्या कॅन्सरच्या दुर्धर आजारातील चौथ्या टप्प्यातून यशस्वी बाहेर पडल्या.
श्रीमान विठ्ठलराव यांची सासरवाडी बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील ताटेवाड परिवाराबद्दल सांगताना श्री विठ्ठलराव म्हणतात, या माझ्या परिवाराच्या संसारासाठी ताटेवाड परिवाराचे मोठे योगदान प्रारंभीच्या काळी लाभले होते.
त्यांचे सासरे व प्रसिद्ध हातमागचा विणकर काम करणार हे कुटुंब तालुक्यातच नव्हे तर सर्व जिल्ह्यात सर्वश्रुत होते त्यांनी विणलेला कपडा हा महाराष्ट्र तथा तेलंगणापर्यंत नावाने विकायचा, त्यातच ते अत्यंत कष्टाळू आणि आपल्या पाल्यांप्रती निखळ प्रेम करणारे होते त्यातच श्रीमान विठ्ठलराव हे मोठे जावई म्हणून आपल्या मुलीच्या संसारासाठी हात सोडून खर्च करणे त्यांना जिव्हाळ्याचे नव्हे तर आनंदाचे होते यामुळेच की काय मुलीचे गागलेगाव येथील पूर्ण एकत्रित कुटुंब विखरण्याच्या काळात सावरल्या गेले होते. हे विसरता येणार नाही.
हाच वारसा जसाच्या तसा पुढे ठेवून हे दांपत्यांनी मुखेड आणि धर्माबाद येथे आपल्या मुलींचा योग्य कुटुंबात विवाह करून आपले दायित्व पूर्ण केले मुलांचे आणि याचबरोबर मुलांना योग्य ते शिक्षण देऊन पायावर उभं करण्यासाठी आवश्यक ते वातावरण देण्याचा शक्य तितक्या पद्धतीने प्रयत्न केला. त्याचेच वसा घेऊन शेतीचे मेहनतीने सोनं करण्याचा काम शेतीमध्ये छोट्या मुलाने तर सार्वजनिक, सामाजिक, व्यावसायिक, नातेसंबंध, बहुराष्ट्रीय कंपन्या क्षेत्रातील कामाच्या बाबतीत अर्थ नियोजन, लाईफ मॅनेजमेंट, दूरस्थ शिक्षणाचा माध्यमातून, अमेरिकेतील एमबीए ची पदवी तथा सर्वश्रुत विधी सल्लागार, अभिवक्ता म्हणून या सुखी दाम्पत्याचा मुलगा व त्याचे कार्य सर्वश्रुत आहे. जिल्हा, राज्य व देश पातळी वरील पद्मशाली सर्वतोपरी विकासासाठी समाजाच्या कार्यातही या परिवाराचा प्रारंभीपासूनच वाटा राहिला आहे, सुरुवातीच्या काळापासूनच बिलोली तालुक्यातील पद्मशाली समाजाचे विविध कार्यक्रम घेण्यामध्ये आणि समाज संघटन करणे या बाबी अनेकांना प्रभावीतच करणारे होते.
सुवर्ण महोत्सवी विवाहाचा 50 वा वर्ष साजरा करण्यासाठी या दांपत्याचा नकार अक्षरशा दोन्ही मुलींनी अट्टाहास करून प्रारंभी कसाबसा होकार मिळविला, केवळ आणि केवळ मुलींच्या हट्ट आणि प्रेमामुळे त्यांनी कार्यक्रम करण्यासाठी होकार दिला, पण त्यांच्या मनातील एक सुख तिच्या त्यांनी बोलावून दाखवली ती म्हणजे माझ्या बहिणी त्यांचे मुलं मुली या सर्वांपर्यंत चांगल्या प्रकारचे आहेर घेण्याचे त्यांनी बोलून दाखवले आणि त्याच प्रमाणे सदर कार्यक्रमात तसे नियोजनही करण्यात आले, तरीही प्रसिद्धी आणि मोठेपणा यापासून कोसो दूर राहून *कर्म हेच, माझे दैवत* मानणाऱ्या व्यक्तींचा हा आजचा कार्यक्रम. मराठवाड्यातील अद्वितीय ठरतो आहे.
-शब्दांकन- गोविंद मुंडकर, ज्येष्ठ पत्रकार, नांदेड.मो. ८३२९०९५३०३