हिमायतनगर। शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात. डाॅक्टर आंबेडकर यांच्या अगोदरच्या काळात कित्येक वर्षापुर्वी महात्मा बसवेश्वर महाराजांनी उपदेश करताना सांगीतले की, शिक्षण घ्या ज्ञानीवंत व्हा, शिक्षणाने माणूस विवेकी बनतो, म्हणुन शिक्षण घेतले पाहीजे, शिक्षणाने असा माणूस घडत असतो, त्याकरिता शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन आहे. म्हणून प्रामूख्यानं आपण शिक्षण घेतले पाहीजे,असा उपदेश त्या काळी महात्मा बसवेश्वर महाराजांनी केला आहे. असे प्रतिपादन आर्य वैश्य महा सभेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा पळशिकर यांनी केले.
हिमायतनगर येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी आयोजित कार्यक्रमात पळशिकर बोलत होते. पुढे बोलताना पळशिकर म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाराज यांनी आपले जिवन समाजाच्या उत्थानासाठी समर्पित केले. त्यांनी त्यागाची समर्पणाची शिकवण दिली.स्वतःमधील दोष दुर करून कर्मकांडापासून अलिप्त राहण्याची शिकवण महात्मा बसवेश्वर महाराजांनी दिली. असे सुरेश अप्पा पळशिकर यांनी या प्रसंगी सांगीतले.
आपल्या मनोगतात सेवानिवृत्त आदर्श शिक्षक आकलवाड यांनी वचने लिहा, साहित्य वाचन करून आपल्यात वाजन संस्कृती रूजवावी, स्वताची स्तुती स्वतः करणे चुकीचे असून, महात्म्या बसवेश्वर महाराजांनी साध्या आणी सरळ शब्दामध्ये माणसाला विवेकी घडविण्याची आदर्श शिकवण दिली असल्याचे त्यांनी सांगीतले. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे सामूहिक पुष्पपुजन करून अभिवादन करण्यात येवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यानंतर हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात देखील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, अक्कलवाड सर, राजू गजेवार, सटवाजी चवरे, वर्हाडे सर, बाळासाहेब चवरे, नारायण स्वामी, संतोष गाजेवार, संतोष पळशिकर, गजानन वारकड, मुलंगे साहेब, शिवकुमार भुरे, संतोष गाजेवार, रमेश अप्पा पळशिकर, गजानन तुप्तेवार, वामनराव बनसोडे, अनिल मादसवार, संजय माने, विलास व वानखेडे, परमेश्वर शक्करगे, अमोल कोटूरवार, मुकुंद, सुरेश चप्पलवाड, पत्रकार सोपान बोंपीलवार आदींची प्रामूख्याने उपस्थती होती.