ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी सकल मराठा समाजाकडून कडून रास्ता रोको आंदोलन
नवीन नांदेड। सकल मराठा समाज बांधवांचा वतीने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नांदेड हैदराबाद रोडवरील चंदासिंग काॅर्नर व नांदेड ऊस्मानगर रोडवरील बाभुळगाव पाटी येथे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी तिन तास आंदोलन करण्यात आल्यामुळे जाणारी येणारी वाहतूक प्रचंड खोळंबली होती.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता, यावेळी सई पाटील या लहान मुलीच्या हाताने निवेदन पोलीस प्रशासनाला देऊन राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी सकल मराठा समाज बांधवानी मोठया प्रमाणात राज्य सरकार च्या विरोधात घोषणाबाजी केली.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी शासन हे सकारात्मक नसुन, मराठा समाजाच्या रीतसर कुणबी नोंदी मिळून सुद्धा सरकारने सगे सोयरे कायदा आमलात न आणता मराठा समाजाला कायद्यात न टिकणारं 50% च्या वरचं फसवं 10% टक्के आरक्षण देऊन समाजाची घोर फसवणूक केली आहे, याची चिड सकल मराठा समाज बांधवामध्ये निर्माण झाली असुन सगे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या दि.२४ फेब्रुवारी जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एम.आय.डी.सी.चंदासिंग काॅनर येथे ग्रामीण भागातील बळी रामपुर, तुप्पा, राहेगाव,भायेगाव,धनेगाव, किक्की, कांकाडी यासह अनेक गावातील सकल समाज बांधवांचा वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी मराठा सकल समाज समन्वयक शाम पाटील वडजे,गजानन कहाळेकर,संभाजी जाधव,बालाजी पाटील भायेगावकर,रवि देशमुख सरपंच,दता पाटील कदम, सुदीन बागल, गौरव शिंदे,संकेत पाटील, शिवाजी हंबरडे, शशिकांत गाढे, योगेश काकडे, बाळु पाटील हातणीकर, राम पाटील कदम, बळीराम पाटील जाधव,एकनाथ खोसडे,श्रीकांत जाधव, हिवराळे,नितीन आंळदीकर,आनंद जाधव, राम माळगे,यांच्या सह समस्त सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी प्रमुख पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
नांदेड ऊस्मानगर रोडवरील बाभुळगाव पाटी जवळ सरपंच पुंडलिक मस्के, शिवा हबर्डे, सुरयभान मोरे, सचिन मस्के, ऋषीकेश पाटील, दता मस्के, दता बोडके, बंडू बोडके, कैलास हबर्डे, सुनिल बोडके, माधव बोडके, संग्राम मस्के, कैलास भरकडे, धनाजी मस्के, विष्णु मस्के यांच्या सह समस्त मराठा सकल समाज बांधव उपस्थित होते, यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे यासह विविध मागण्यासाठी घोषणा देण्यात आल्या.
सुमारे तिन तास चाललेल्या या रस्ता रोको आंदोलन मुळे नांदेड हैदराबाद रोडवरील व नांदेड ऊस्मानगर रोडवरील जाणारी येणारी वाहतूक खोळंबली, यावेळी कुं.सई पाटील या लहान मुलीच्या हस्ते मराठा सकल समाज बांधवाचे निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. रास्ता रोको आंदोलनाचा दोन्ही ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक व ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार, महिला पोलीस, होमगार्ड यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.