आरक्षणात गैरओबीसींना समाविष्ठ करू नये; उमरखेड तालुका सकल ओबीसी समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
उमरखेड। मराठा समाजाच्या दबावापोटी मुळ ओबीसींच्या आरक्षणावर घाला घालण्याचे काम सरकारकडून होत असून अनेक ठिकाणी शासकिय दप्तरात खोडतोड करून नव्याने जातीचा उल्लेख करण्यात आलेला असल्यामुळे महाराष्ट्रातील सकल ओबीसीसमाज चिंताग्रस्त झालेला आहे. शासनाने या बाबींचा सारासार विचार करून मुळ ओबीसींच्या आरक्षणावर घाला न घालता इतर गैरओबीसींना ओबीसी आरक्षणात समाविष्ठ करू नये , अशा विविध मागण्यांचे निवेदन उमरखेड तालुका सकल ओबीसी समाजातर्फे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागिय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे .
ओबीसींमध्ये महाराष्ट्रात जवळपास 374 पेक्षा जास्त जातींचा समावेश आहे यात कुणबी ही जात पुर्वीपासूनच ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असून विदर्भ कोकणातील कुणबी समाज गेले कित्येक वर्षापासून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे त्यास ओबीसी जातींनी कधीही विरोध केला नाही . तसेच घटनेच्या चौकटीत गरीब मराठा समाजातील गरजूंना सवलती देण्यासही ओबीसींचा विरोध नाही ,मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा मुळीच विरोध नाही . असे असतांना शासनाकडून मराठा समाजाला सगेसोयरे यासह आरक्षण दिले गेल्यास राज्यातील 54 ते 55 टक्के ओबीसी समाजाला आरक्षण लाभाला मुकावे लागणार असल्याने शासनाने मुळओबीसी मध्ये होणारी घुसखोरी तत्काळ थांबवावी , मराठा आंदोलकांच्या भितीपोटी शासनाकडून अनेक ठिकाणी शासकिय दप्तरात खोडतोड करून नव्याने जातीचा नामोल्लेख केलेला आहे .
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी , कर्मचारी यांच्या विरुद्ध तत्काळ फौजदारी कार्यवाही करावी व त्यांना सेवेतून बडतर्फ करावे , ओबीसी समाजातील विविध महामंडळांना सारथीच्या धर्तीवर नीधी उपलब्ध करून देण्यात यावा . इतर राज्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती व इतर सवलती द्याव्या . विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेल्या वस्तीगृहांची अमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागिय अधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहे .
निवेदन देताना यावेळी माजी नगराध्यक्ष राजुभैया जयस्वाल , बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे , ॲड . संतोष जैन, सचिव अरविंद ओझलवार , दिलीप सुरते , सतिश नाईक , बाळासाहेब नाईक , प्रभाकर दिघेवार , शेख इसराईल शेख महेमुद ,राहुल सोनुने , रमेश चव्हाण ,कविता मारोडकर, मनिषा खंदारे, शैलेश ताजवे , सविता चंद्रे, निळकंठ धोबे , संतोष मुडे , शैलेश अनखुळे, संजय भंडारे , हरिदास इंगोलकर , विश्वनाथ कानडे ,विष्णू शेळके, अश्विन टाक स्वप्निल सोसते ,कैलास दहेकर, प्रवीण इंगळे , पुंडलिक कुबडे, प्रमोद चेन्नावार, अमोल तुपेकर ,सुनील चेके , अविनाश पोंगाणे राम बोकन ,कैलास हुलकावणे ,महेश शहाणे, राजेश कवाने , शैलेश अनखुळे,आनंद जटाळेसह शेकडो जनांची उपस्थिती होती .