बुद्धांच्या विचारांची आजच्या काळाला नितांत गरज- धम्म परिषदेत पूज्य भन्तेजी याची धम्मदेशना
लोहा| दोन हजार पाचशे वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी शील प्रज्ञा, समाधी सदाचार याची शिकवण दिली त्याचे अनुकरण करण्याची आज नितांत गरज आहे.धम्म परिषदेच्या माध्यमातून आजच्या काळात बुद्धांच्या विचारानेच जीवन मंगलमय होणार आहे अशी धम्मदेशना पूज्य भन्तेजी यांनी केली
लातूर चे खासदार सुधाकर श्रुंगारे यांच्या पुढाकाराने लोह्यातील बैल बाजार येथे भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पूज्य भन्ते धम्मसेवक महाथेरो,भन्ते डॉ खेमो महाथेरो,भदंत पय्यातीस महाथेरो, भदंत पय्यारत्न थेरो, भदंत मुदितानंद थेरो, भदंत बुद्धीकीर्ती, भदंत शीलरत्न थेरो, भदंत रेवत बोद्धी थेरो, भदंत धम्मकीर्ती, भदंत संघप्रिय , भदंत धम्मघोष, भदंत धमाबोधी थेरो यांनी धम्मदेशना दिली.
पूज्य भन्तेजी यांनी धम्मदेशना करताना बुद्धाच्या शिकवणीची आज कशी गरज आहे .हे सांगताना आपली श्रद्धा गळून गेलेल्या झाडा सारखी आहे.आपण शील, प्रज्ञा, सदाचार याचे अनुकरण करणे गरजेचे आहे पंडित लोकांची सांगत असली पाहिजे व्यसनाधीनता पासून दूर राहिले पाहिजे आपल्या पेक्षा ज्ञानी शिलवंत असलेल्याची आपण पूजन केले पाहिजे असद सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला .समता स्वातंत्र बंधुता न्याय दिला .आज च्या काळात गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब याचे विचारच आपल्या जीवनास मंगलमय करू शकते .आज समाज विस्कळीत झाला आहे.चिंतन करण्याची वेळ आली आहे असे प्रवचन भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत धम्मसेवक महाथेरो ( मुळावा-उमरखेड) भदंत पय्यारत्न थेरो, भदंत डॉ खेमोधामो, भदंत शीलरत्न थेरो यांनी केले.
खासदार श्रुंगारे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या बौद्ध धम्म परिषदेचे उदघाटन भिख्खू संघाचे अध्यक्ष भदंत धम्मसेवक महाथेरो ( मुळावा-उमरखेड )यांच्या हस्ते झाले . उपस्थित भन्तेजी याचे स्वागत धम्म परिषदेचे आयोजन संजय कांबळे, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, माजी उपनगराध्यक्ष सुधाकर कांबळे, बालाजी खिल्लारे, संजय सोनकांबळे, प्रा.बालाजी आचार्य, महेंद्र ससाणे , ऍड दिगबर गायकवाड, अनिल धुतमल, सुनील क्षीरसागर, नरेंद्र गायकवाड, नामदेव बुद्धे, सतीश निखाते, अजय हंकारे, चांदू जाधव, राजेश ढवळे, अनिल गायकवाड, सचिन आढाव, शाहीर गौतम पवार, यांनी पूज्य भन्तेजी याचे स्वागत केले पंचशील ध्वजारोहण संजय कांबळे यांच्या हस्ते झाले.रत्नाकर महाबळे धोंडिबा यानभूरे यांनी वंदना घेतली.
शहरात बौद्ध धम्म परिषदे निमित्ताने शहरात निळ्या कमानी तसेच पंचरंगी ध्वज लावण्यात आले होते ।तालुक्यातील मोठ्या संख्येने धम्म उपासक उपस्थित होते.दिवसभर परिषद स्थाळी भोजन व्यवस्था होती.खासदार श्रुंगारे व खासदार चिखलीकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.कार्यक्रमापूर्वी शाहीर गौतम पवार यांच्या भीम गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री उशिरा भीमगायिका मंजुषा शिंदे, (पुणे) ,सपना खरात( अकोला) याच्या भीम गीतांचा व शाहीरी सीमा पाटील ,जॉली मोरे यांच्या एक निळा-एक भगवा तुफानी शाहीरी जलसा पार पडला संचनल प्रा.बालाजी आचार्य , सुमेध एडके यांनी केले.या धम्म परिषदे साठी माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, बालाजी खिल्लारे, नामदेव बुद्धे, अजय हंकारे, ऍड गायकवाड, अनिल धुतमल सतीश निखाते, चांदू जाधव व त्याच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.