न्यूजफ्लॅशचा दणका; हिमायतनगर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मवरील शेडच्या कामाला झालीय सुरुवात
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर येथील रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मवरील शेडसाठी खड्डे खोदून दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला. मात्र या शेडचे बांधकाम कंत्राटदाराणे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे रेल्वे पकडण्यासाठी जाण्याच्या गोंधळात एखाद्या प्रवाशाचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त न्यूजफ्लॅश ३६०डॉटकॉम ने प्रसिद्ध करताच रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदारचे कान टोचले त्यामुळे रखडलेल्या कामाला गज बांधी व फुटिंग भरण्याने सुरुवात झाली आहे. मात्र या कामाची गुणवत्ता ढासळली असून, फुटिंग खाली सिमेंटचा माल कमी प्रमाणात टाकण्यात आल्यामुळे भविष्यती हे शेड अधिक काळ टिकेल कि नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या बाबीकडे नांदेड डिव्हिजनच्या विभागणीय व्यवस्थापकाने लक्ष देऊन बांधकामाची गुणवत्ता वाढविण्याची मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
हिमायतनगर शहर रेल्वे स्थानक गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्येने ग्रस्त झाले आहे. तेलंगणा – विदर्भाच्या मध्यावधी हिमायतनगर येथे असलेल्या या स्थानकात प्रसाधनगृह, पोलीस चौकी, पिण्याच्या पाण्यासह विविध समस्यां भेडसावत आहेत. असे असतानाही याकडे वरिष्ठांकडून प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुदखेड – आदिलाबाद रेल्वेलाइनचे ब्रॉडगेजमध्ये रूपानंतर झाल्यानंतर गेल्यावर्षीपासून इलेक्ट्रॉनिक रेल्वे लाईनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म, क्वार्टरचे काम व एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पूलही करण्यात आला आहे. आता रेल्वे स्थानकावरील शेडचे काम सुरु असून, त्यापूर्वी खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे खोदून जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला मात्र या कंत्राटदार काम पूर्ण करण्याकडे जाणीवपूर्वक बिलंब करून अधिकचे देयके काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे रेल्वेने ये – जा आकारणाऱ्या प्रवाश्याना रेल्वे पकडण्यासाठी जाण्याच्या गोंधळात एखाद्या प्रवाशासोबत अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. खड्डे खोदून दोन महिने होऊन गेले असून,अनेक नागरिक सकाळी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर येतात, अंधारात अनेकजण खड्ड्यात पडले असून, काहींना किरकोळ मार लागला आहे. एखादा मोठी दुर्घटना झाल्यानंतर ठेकेदार शेडचे बांधकाम पूर्ण करणार आहे का..? असा प्रश्न प्रवाशी व नागरिकांनी उपस्थित केल्याचे वृत्त प्रकाशित करताच संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे.
मात्र यातही ठेकेदाराकडून निकृष्ट पद्धतीने थातुर माथूर काम करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. अगोदर सुद्धा या स्थानकावर झालेले काम निकृष्ट मटेरियलचा वापर केल्यामुळे सिमेंट काँक्रेट प्लॅटफॉर्म रत्स्यावर भेगा पडल्या असून ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. तशीच परिस्थिती येथे उभारण्यात येत असलेल्या शेडची होऊ नये यासाठी अंदाजपत्रकाच्या नियमानुसार बांधकाम करण्यात यावे आणि प्रवाश्याना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. याकडे नांदेड विभाग रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकाला अचानक भेट देऊन डोळ्यांनी कामाचा दर्जा पाहावा असेही प्रवाशी बोलून दाखवीत आहेत.