नवीन नांदेड। छावा श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य व जिजाऊ प्रतिष्ठाण, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १८ वर्षा पासून कायम सुरू असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ जयंती महोत्सव-२०२४ याही वर्षी जिजाऊ व्याख्यानमाला व गौरव कर्तृत्वाचा कार्यक्रम आयोजन , दि.२८ जानेवारी २४ रोजी कामगार कल्याण केंद्र सभागृह, सिडको, नवीन नांदेड, येथे दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी साजरा करण्यात आला,जिजाऊ व्याख्यान माला व गौरव कृर्तत्वाचा हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता .
या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वल करूण करण्यात आली. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शंकररावजी हंबर्डे सचिव, काळेश्वर संस्थान, विष्णूपुरी तर कार्यक्रमाचे उद्घाटक विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ प्रमूख मार्गदर्शक शे. रा .पाटील व स्वागताध्यक्ष अनिल धमने पाटील जिल्हा उपाध्यक्ष व्हॉईस ऑफ मिडीया पत्रकार संघ,तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पंढरीनाथजी बोकारे जेष्ठ पत्रकार , विष्णूपूरीच्या सरपंच सौ .संध्याताई हंबर्डे ,आय.आय.बी. क्लासेस चे भोसले नांदेड ,डॉ. विजयानंद भोंग ,संस्थापक गणशांती नर्सिंग स्कुल, हडको , उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड,यांच्यासह मान्यवरांच्यी उपस्थिती होती.
दर वर्षी प्रमाणे मॉ जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरूष यांच्या पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले, या गौरवा मुळे अनेकांना ऊर्जा मिळते व त्यांनी आणखी जास्त जोमाने समाजकार्य करावे त्या साठी त्यांना दिलेला हा सन्मान आहे.
या मध्ये मॉ जिजाऊ पुरस्काराने डॉ.उषा ऊतरवार, सौ.सुनिता चौव्हान, सौ.पुजा बिसेन सौ रंजना सोनकांबळे ,प्राचार्य तेजश्री संघवे ,सौ.सलोचना हंबर्डे, सौ. संध्याताई हंबर्डे यांना तर यशवंत गौरव पुरस्काराने डॉ रामदास बेंदरवाड ,शंकरराव धिरडीकर, इंजि नागनाथ महादापूरे डॉ .संतोष स्वामी,श्याम नायगावे इंजि, हरजींदर सिंघ संधू, दत्ता देशमूख यांना सन्मानित करण्यात आले तर पत्रकार रमेश ठाकूर, किरण देशमूख,सारंग नेरलकर यांच्या सह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव हंबर्डे यांच्या सह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले ,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक छावा श्रमिक संघटना मराठवाडा अध्यक्ष तथा जिजाऊ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भास्करराव हंबर्डे ,यांनी केले, तर सुत्रसंचलन पत्रकार डीगा पाटील यांनी केले तर आभार स्वागताध्यक्ष अनिल धमने पाटील यांनी केले तर, हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिजाऊ प्रतिष्ठाणच्या प्रा.सौ.ममता पाटील जिजाऊ ज्ञान मंदिर, हडको , सौ माधूरी हंबर्डे . स्वागताध्यक्ष अनिल धमने पाटील . नवनाथ औराळकर .आदींनी परिश्रम घेतले .