नवीन नांदेड। तंत्रशिक्षणाची बीजे बाल वयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी व विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांची गोडी लावण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा तयारी साठी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड या संस्थेने विष्णुपुरी येथील प्राथमिक शाळा घेतली आहे.
विष्णुपुरी शाळेतील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. एम बी कोकरे,संचालक गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड यांनी संस्थेच्या वतीने विष्णुपुरी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना 50 सोलार लॅम्प भेट देवून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके व मार्गदर्शन करुन पूर्ण सहकार्य करण्यासाठी विशेष टीम एस.जी.जी. एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने पाठवण्याचे या प्रसंगी संचालकांनी मान्य केले. या प्रसंगी एस.जी.जी.एस.अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. एस.बी.देठे, डॉ.अरुण पाटील व इतर सहकारी उपस्थित होते.
या प्रसंगी संचालक डॉ. एम.बी.कोकरे यांच्या तंत्रशिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शाळेच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षक डी. केंद्रे व सोमनाथ बिदरकर यांनी तयार केलेल्या उपक्रमाचा व्हिडिओ एलसीडी स्किन द्वारे दाखवून शाळेची प्रगती दाखण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या वतीने भारतीय लष्करात नवीन लेफ्टनंट निवड झालेल्या मंदीप सिंग जितेंद्र सिंग शिलेदार यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे गोविंद नांदेडे यांचासह,भार्गव राजे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री साहेबराव हंबर्डे, विश्वनाथ हंबर्डे, शंकरराव हंबर्डे, सरपंच सौ.संध्या विलास देशमुख हंबर्डे, उपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे, राजेश हंबर्डे, अनिल हंबर्डे, संतोष बारशे, गोविंद हंबर्डे श्री बाबुराव हंबर्डे, फौजी श्री शिवाजीराव काचमांडे, प्राध्यापक प्रमोद हंबर्डे, श्री केशवराव चव्हाण, श्री गिरमाजी हंबर्डे व बहुसंख्य पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्तावित मुख्याध्यापक उज्वला कृष्णाजी जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय काशिनाथराव हंबर्डे,पर्यवेक्षक श्री शिवाजी वेदपाठक,आनंदवन विकास दिग्रसकर,पंचफुला नाईकवाडे ,चंद्रकला जयश्री देव शेट्टी, अर्चना देशमुख वैशाली कुलकर्णी, कांचन माला पटणे व शिक्षक, शिक्षिका कर्मचारी यांनी भरीव परिश्रम घेतले.