नवीन नांदेड। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात सिडको हडको व ग्रामीण परिसरातील युवकांनी ऊतसफुरत पणे सहभागी होऊन रक्तदान केले. यावेळी सहभागी रक्तदान दात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी युवा शक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रथम कै. सुरेश पाटील घोगरे, श्रीकांत बाबाराव वानखेडे यांना श्रध्दांजली अर्पण करून रक्तदान शिबीर सुरूवात करण्यात आली. शामराव हंबर्डे,गजानन कते,योगेश सोमाणी, ऑड. सुनिल पाटील, गोपीकृष्ण पपुलवाड, गजानन लोढे,दता वरपडे,मंगेश कदम, संतोष हंबर्डे मुन्ना शिंदे यांच्या सह अनेकांनी रक्तदान केले, डॉ. शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे अवचार व कर्मचारी,जिवन आधार रक्तपेढीचे कर्मचारी यांनी रक्त संकलन केले.
दरवर्षी युवा शक्ती मित्र मंडळ यांच्या कडून रक्तदान करून आतापर्यंत हजारो रुग्णाचे जिव वाचविले आहेत, या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शुभम घोरबांड, अविनाश मोरे, अनिल पाटील, संजय मोरे, नामदेव घोगरे, कपिल चपटे, ज्ञानेश्वर घोगरे,किरण कापसे, यांच्या सह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.