नवीन नांदेड। बाभुळगाव गावातील शेतकरी यांच्या शेतातील विहीरी वरील, बोअर मधील, कॅनाल वरील सर्वच मोटारी जवळपास १५ विधुत मोटारी गेल्या महिन्यात अज्ञात व्यक्तीं कडून चोरीस गेल्या असुन त्रस्त शेतकरी व सरपंच पुंडलिक मस्के पाटील,शिवसेना ऊबाठा गट तालुका प्रमुख अशोक मोरे व ग्रामस्थ यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक आयलाने यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
बाभुळगाव व हेमलातांडा येथील शेतकरी प्रकाश गंगाधर मोरे,गोविंद दिगंबर मोरे,लक्षमण दिगंबर मोरे,रावसाहेब बालू राठोड,भिमराव शेकोजी हणमंते,व्यंकटी बाबाराव काळे, मधुकर पवार, गोविंद मारोती मस्के, धोंडीबा दिगंबर बोडके,शेषेराव मारोती मस्के,रामाजी दुलबा मस्के,शिवाजी संभाजी मस्के,नागोराव मस्के यांच्या शेतातील,बोअर मधील व कॅनाल मधील मोटारी गेल्या एक महिन्याच्या कालवधीत गेल्या आहेत.
या बाबत पोलीस स्टेशन येथे तक्रारी देण्यात आल्या आहेत,अखेर या प्रकरणी सरपंच पुंडलिक पाटील मस्के ,अशोक मोरे,प्रकाश मोरे, शिवाजी मस्के, गोविंद मस्के, माधव मोरे यांच्या सह ग्रामस्थ यांनी निवेदन दिले आहे. या विधुत मोटारी चोरी मुळे शेतकरी हतबल झाले असून लवकरात लवकर तपास करण्याची मागणी केली आहे.