नांदेड| राष्ट्रीय दृष्टीहीन संघ मुंबई महाराष्ट्र राज्य द्वारा 34 वा राज्यस्तरीय अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह 2024 शेगाव जि.बुलढाणा येथे दिनांक 09 जानेवारी 2024 ते 13 जानेवारी 2024 या कालावधी राज्यस्तरीय अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह घेण्यात आहे. त्यामध्ये दृष्टीहिन मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये इ. 1ली ते 4 थी गट व इ. 5 वी ते 7 वी गट इ. 8 वी ते 10 वी या गटात ब्रेल वाचन,लिखान,कथा कथन, भाषण स्पर्धा, वैयक्तीक वादन, गायन, समुह गित, नाटय स्पर्धा, नृत्यु आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 25 अंध शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड संचलित, निवासी अंध विद्यालय,वसरणी नांदेड या शाळेने इ. 1 ली ते 4 थी या प्रवर्गात महाराष्ट्रातुन तिसरा क्रमांक मिळवला आहे त्याच बरोबर वैयक्तीक स्पर्धामध्ये सुगम गायनामध्ये इ. 1 ली या वर्गातील 1) कु. गौरी मुळे हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. 2) कु. स्नेहल काला या मुलींने हिंदी व इंग्लीश वृकत्व स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे 3) चि. प्रबुध्द मधुकर भद्रे यांनी सुगम गायनामध्ये उत्तेजनार्थ बक्षिस मिळवले आहे. 4) चि. फुलाजी सोनसळे यांनी मराठी भाषणामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच स्त्रीभ्रृण हत्या नृत्यामध्ये कु. श्रृतिका काळे, विशाखा लांडगे, अनिकेत पांचाळ, ज्ञानेश्वर भोंग, ज्ञानराज मोरे, वसुंधरा हंबर्डे, भावना लिंबाळकर असे एकुण 13 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या यशामुळे दृष्टीहिन मुलांमध्ये आनंद पसरला आहे. संस्थेचे सचिव, श्री. विठल संभाजीराव गुटे शाळेचे मुख्याध्याप बाबाराव इबितवार व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सन्मान देवुन कौतुक केले आहे.