
सोनारी फाटा/हिमायतनगर, शेख खय्युम।बनाशिक येथे राज्यस्तरीय पार पडलेल्या क्रिडा स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील, १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यानी ठाणे विभागातील खेळाडूंना अंतीम सामन्यात पराभूत करून दणदणीत विजय मिळविला आहे. तर राज्यांतून प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान प्राप्त करून क्रिडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राज्य स्तरांवर आपली छाप पाडली आहे.
नाशिक येथे राज्यस्तरीय विविध क्रिडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. या मध्ये शासकीय आदिवाशी आश्रम शाळा दुधड येथील वय वर्ष १४ वर्ष वयोगटातील कु. दिपाली मुरमूरे या विद्यार्थ्यानींने ४०० मिटर धावने या स्पर्धेत विशेष विजय संपादन करीत राज्यांतून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर १७ वर्ष वयोगटातील अकाश राजू गेडाम यांने लांब उडी या प्रकारात राज्यांतून दुसरा क्रमांक मिळवून ऐतिहासिक विजय मिळविला आहे. ग्रामीण भागातील या शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यानी ठाणे विभागाला हरवून मराठवाडय़ातून अव्वल क्रमांक मिळवीत ग्रामीण भागातील विद्यार्थी “हम भी किसीसे कम नही” असे दाखवून दिले आहे.
पराक्रमी, व उज्ज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थ्याचे किनवट चे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी क्रांतीकेयन , सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र शेळके, शिक्षण विस्तार अधिकारी टिळे, किनवट प्रकल्पाध्यक्ष मु. अ. तथा प्राचार्य प्रल्हाद चामे, शिक्षक मकरंद मुधोळकर, तुकाराम अडबलवाड, शिक्षक घुले, राठोड, खान, चाटे, श्रीमती दरणे, प्रशिक्षक सचिन शिंदे, यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
