नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे बरबडा येथील तरुण जमीन खान शादुलखान पठाण चा खुन करुन मोटरसायकल ला दगडाने बांधुन नदिचा मधोमध विसफुट पाण्यात टाकले हि घटना दिनांक 11 रोजी सकाळी मछी पकडण्यासाठी गेलेल्या जाळ्यात मासाचा एक फुटाचा तुकडा सापडला तेव्हा सदर घटना उघडकीस आली. कुंटूर पोलीस घटना स्थळी रात्रभर जागून सदर मांसाचा तुकडाची तपासणी साठी पाठवले. तेव्हा मयताचे वडील व आई चा डियने बरोबर मिळाले असल्याचे सांगितले.
अवैध दारु अवैध डग्स, इंजेक्शन ,विक्रीचे कारण असल्याची बाब समोर आली आहे. या खुनाच् सुत्रधार संशयितांना 1)चक्रधर दिगंबर शिंदे २)प्रथमेश प्रकाश पानपटवार ३)पवन प्रभू वाचनवाढ ४)माधव परशराम राठोड, ५)गोविंद शंकर रेडेवाड,हे दोषी असल्याचे मयताचे भाऊ अजित खान शादुल खान पठाण यांनी पोलीस अधीक्षकाकडे दोन महिन्यापूर्वी तक्रार केली होती मयताचे पत्नी परिण बेगम पठाण मुलगी आलीया पठाण, वय वर्ष 3 मुलगी ,नबिया पठाण वय वर्ष चार महिने असे परिवार आहे.मयताचे भाऊ आजिम पठाण यांनी सांगितले.
त्यामुळे सदरचे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सोनवणे हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले व जमीलखान पठाणच्या भावाकडून संशयिताची माहिती मिळवली. माहिती मिळताच गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या टिम ने पाच संशयीतांना ताब्यात घेतले. अवैध दारू विक्री, आमली पदार्थ, ड्रग्स चे इंजेक्शन 15 ते16 वर्ष वयाचे तरुण मुले ही ड्रग्स चे इंजेक्शन घेत आसुन तरुण वर्ग अंमली पदार्थांच्या सेवनाने जीवन बरबाद करत होत आहेत.
जमीलखान पठाण हा अवैध धंद्याची माहिती पोलिसांना देत होता. त्यामुळे या जमीलवर राग होता. या रागातून त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला. नियोजनबद्ध कट रचून दि. २ नोव्हेंबर रोजी जमील पठाणला रात्रीला बोलावून घेण्यात आले. गोदावरी नदी पात्रांच्या जवळील एका शेतात नेवून अगोदर त्याचा गळा दाबून खुन केला व त्याच मोटारसायकलला ताराने बांधून गोदावरी नदीत फेकून देण्यात आले. असा जबाब दिल्याचे समजले आहे.
दोन महिण्यापुर्वी गायब झालेल्या जमील पठाण याचा खुन झाल्याची खळबळजनक घटना समजणाच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून. अतिरिक्त पोलीस अधिक्षकासह, बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी, फाँरेंसीक विभागाचे पथक, राखीव दलाचे पथक व कुंटूर पोलीसांची यंत्रणा बरबडा येथे दाखल झाली असून मयताचा गोदावरी नदी पात्रात शोध घेण्यासाठीही विशेष पथकाला बोलावण्यात आले आहे.
जमीलखान पठाण हा दोन महीण्यापुर्वी गायब झाल्याची तक्रार कुंटूर पोलिसांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने तर घेतले नाहीच पण पठाण कुटंबीय पोलीस ठाण्यात जावून काहीतरी चौकशी करा साहेब अशी विनवणी करत होते पण त्यांना काहीही प्रतिसादही दिला नाही. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय बारकाईने या प्रकरणाचा तपास करुन आरोपी निष्पन्न केले आहे.पुढिल तपास चालू आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.