नवीन नांदेड। ६ जानेवारी दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तर दर्पण दिनानिमित्त पत्रकार तथा मार्गदर्शक, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या टिन शेड सेंटर येथे दर्पण दिन साजरा करण्यात आला, यावेळी बळीरामपुर ग्रामपंचायत सदस्य नरसिंग गडपवार, संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर, सचिव बालाजी सुताडे,जेष्ठ विक्रेते शेख सयोधदीन, महिला वितरक वंदना लोणे, लोकमत वितरण सिडकोचे गणेश डोळस व वृत्तपत्र विक्रेते यांची उपस्थित होती.